शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सायकल, शिलाई मशिन साहित्य खरेदीला ब्रेक

By admin | Updated: July 3, 2015 00:28 IST

सायकल आणि शिलाई मशिनची जादा दराने खरेदी करीत असल्याचे उघडकीस आणूनही त्याचे समर्थन करणाऱ्या सह आयुक्त दिलीप गावडे व मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर

पिंपरी : सायकल आणि शिलाई मशिनची जादा दराने खरेदी करीत असल्याचे उघडकीस आणूनही त्याचे समर्थन करणाऱ्या सह आयुक्त दिलीप गावडे व मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर यांना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी घेराव घातला. खरेदीबाबत जाब विचारला. दोन्ही साहित्यखरेदी प्रक्रियेबाबत महापालिकेच्या दक्षता व नियंत्रण विभागाकडून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच खरेदीची पुढील कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. महापालिकेतर्फे महिलांना स्वयंरोजगारासाठी १३ हजार २९० शिलाई मशिनचे मोफत वाटप केले जाणार आहे. बाजारात एका मशिनची किंमत ३ हजार ८३ रुपये आहे. मात्र महापालिका ४ हजार ७७७ रुपयांना एक मशिन खरेदी करणार आहे. त्यामुळे या खरेदीत दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप नगरसेविका सीमा सावळे व आशा शेंडगे यांनी केला होता. तसेच संबंधित मशिन चायनामेड असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. महिलांची फसवणूक होणार असून, ती थांबविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच केमिकल पुरवठ्याचा व्यवसाय करणाऱ्या ठेकेदाराकडून दहा हजार सायकलींच्या खरेदीचाही घाट घातला जात असून, साहित्य खरेदी रद्दची मागणीही त्यांनी केली होती. निविदा प्रक्रिया दर योग्यच असल्याचे सह आयुक्त, मुख्य लेखापरीक्षकांनी स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे सावळे व शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे शंभर महिलांनी अधिकाऱ्यांना खरेदीचा जाब विचारला. घेराव घातला. या दोघांनाही खरेदी करीत असलेल्या मशिनचे आॅनलाइन दर या वेळी दाखविले. त्यानंतर मशिनचे दर १ हजार ६९५ रुपयांनी जादा असल्याचे अधिकाऱ्यांनी लेखी मान्य केले. दक्षता व नियंत्रण विभागाकडून तापसणी करून खातरजमा झाल्यानंतरच शिलाई मशिन व सायकलींचा पुरवठा करण्याचे ठेकेदाराला आदेश देण्याचे लेखी पत्र सह आयुक्तांनी दिले आहे. या आंदोलनात सारिका पवार, नीता कुशारे, साक्षी काटकर, सरिता शर्मा, नंदा करे, हर्षा शिंदे, गीता महेंद्रू, आदिती क्षेत्री, जयश्री नवगिरे, जयंती गायकवाड, वंदना भडकवाड, स्वाती हुलावळे, अलका हुलावळे, शिल्पा मर्ढेकर, अनिता गुजर, सुनीता हिरोटे, मीना चांदणे, वंदना पारचा, सुनीता सोनवणे, संध्या पारचा, पूजा गायकवाड, मंगल म्हस्के, सोफिया खान, शर्मिला शिंदे, अश्विनी मोरे आदी सहभागी झाल्या.(प्रतिनिधी)