शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतरचा हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
6
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
10
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
11
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
12
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
13
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
14
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
15
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
16
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
17
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
19
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
20
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:18 IST

अंधश्रध्दा निर्मुलनाबाबत कडक कायदे अस्तित्वात असताना कायद्याला न जुमानता असे विचित्र प्रकार घडतात, ही शाेकांतिका असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितले आहे

बारामती: बारामती नगरपरीषद निवडणुकीसाठी सोमवारी(दि १७) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, याच दिवसाच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने केलेली पुजा चर्चेत आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहयोग सोसायटीजवळच हा खळबळजनक प्रकार केल्याचे समोर आले आहे. नारळ, लिंबु, वेगवेगळ्या डाळी, काळ्या रंगाची काढलेली चांदणी, हळद कुंकु, गारगोटीचे दगड वापर करुन पूजा केली आहे. निवडणुकीच्या काळात अज्ञात व्यक्तीने केलेल्या पुजेचा हेतू अद्याप समोर आलेला नाही.

याबाबत बारामती येथील अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष विपुल पाटील यांनी सोशल मिडीयावर माहिती दिली आहे. पाटील  छत्रपती कारखान्याचे संचालक अजित पाटील, अभिनेते रामभाऊ जगताप यांच्यासह सोमवारी सकाळीच सहयोग सोसायटीपासून माॅर्निंग वाॅकसाठी निघाले होते. यावेळी वाटेवर  काही अंतरावर मुख्य रस्त्यावरच कुणीतरी पूजा करून भानामतीचा उतारा ठेवलेला होता. येणारे जाणारे घाबरूनच जरा दुरून चालत होते. स्वच्छता करणारी महिला मनातील अंधश्रद्धेमुळे ते स्वच्छ करायला धजावत नव्हती. शेवटी पाटील यांनी उतारा ठेवलेल्या ठिकाणी थांबून ती जागा साफ करायला लावली. ज्याने कोणी मनात काही मनसुबे ठेवून ही पूजा केली होती ती पोत्यात भरली. व कचरा डेपोकडे रवाना करायला स्वच्छता कर्मचाऱ्यांना सांगितले.
         
इलेक्शन जवळ आले की, अशा गोष्टी घडतात कदाचित इलेक्शनसाठी उमेदवारी मिळावी म्हणून असेल किंवा व्यक्तिगत कारणासाठी. परंतु ज्या बारामतीला सिंगापूरच्या धर्तीवर सुधारले जात आहे. त्याच बारामतीत अशा खुळचट विचाराने रस्त्यावर कर्मकांड होत असतील तर आपण नेमके चाललोय कुठे, विकासाच्या घोडदौडीमध्ये बदलत्या बारामतीचे नेतृत्वही सक्षम उमेदवाराकडे असले पाहिजे. जो वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणारा असेल, सुशिक्षित असेल, समंजस व सुस्वभावी असेल, ज्याच्यात विनम्रता असेल व कामांमध्ये गती असेल, विकासाच्या टप्प्यावर तो या वैभवशाली बारामती नगरीला आणखी पुढे नेणारा असेल, तसेच तो ठेकेदाराशी संधान साधून कमिशनवर काम करणारा नसेल. असा नगराध्यक्ष बारामतीला लाभायला हवा. तरच ही विकासाची गंगा अखंड वाहत राहील,.खरयं ना,असा सवाल पाटील यांनी केला आहे. विषेश म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहयोग सोसायटीतील  निवासस्थान येथुन काही अंतरावर आहे.

अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष विपुल पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले कि, अंधश्रध्दा निर्मुलनाबाबत कडक कायदे अस्तित्वात आहेत. तरी देखील कायद्याला न जुमानता असे विचित्र प्रकार घडतात, ही शाेकांतिका असल्याचे पाटील म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Black magic ritual near Ajit Pawar's house sparks election buzz.

Web Summary : A black magic ritual with lemons and dolls near Ajit Pawar's residence in Baramati has stirred controversy ahead of elections. Superstition and political motives are suspected, prompting calls for rational leadership.
टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBaramatiबारामतीnagaradhyakshaनगराध्यक्षElectionनिवडणूक 2024Social Viralसोशल व्हायरलNCPराष्ट्रवादी काँग्रेस