शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बारामती-इंदापूर राज्य महामार्गावर बाभळीच्या झाडांची साल काढून विकणारी टोळी सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 14:07 IST

बारामती-इंदापूर राज्य महामार्गाच्या कडेने असणारे वृक्ष माथेफिरूंचे लक्ष्य बनले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : हातभट्टी दारूच्या निर्मितीसाठी झाडांची कत्तलरस्त्याच्या कडेने शेकडोवर्षांपूर्वीचे वृक्ष: देशीबाभूळ, वड, कडूनिंब यासारखे मोठ्याप्रमाणात

बारामती : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष वृक्षसंपदेच्या मुळावर आले आहे. बारामती-इंदापूर राज्य महामार्गाच्या कडेने असणारे वृक्ष माथेफिरूंचे लक्ष्य बनले आहे. आता तर दिवसाढवळ्या या वृक्षांचे अपरिमित नुकसान केले जात आहे. रस्त्याच्या कडेने शेकडोवर्षांपूर्वीचे वृक्ष आहेत. यामध्ये देशीबाभूळ, वड, कडूनिंब यासारखे देशी वृक्ष मोठ्याप्रमाणात आहेत. सोमवारी (दि. २४) सकाळी साडेदहाच्या सुमारास बेलवाडी (ता. इंदापूर) गावाच्या हद्दीतील खारओढा येथे दोन ते तीन भुरटे चोर देशी बाभळीच्या झाडांची साल काढताना येथील जागरूक नागरिकाला अढळून आले. संबंधित नागरिकाने या चोरट्यांना हटकले असता त्यांनी काढता पाय घेतला. हे भुरटे चोर मोटारसायकल, कुऱ्हाड तसेच पिशवीमध्ये बाभळीची साल घेऊन पसार झाले. देशी बाभळीची साल काही मद्यपी व भुरटे चोर दिवसाढवळ््या काढून नेतात. यामुळे बाभळीचे झाड काही दिवसात जळून जाते.

 इंदापूर तालुक्यातील लासुर्णे, बेलवाडी, अंथुर्णे, सणसर, शेळगाव या परिसरात बाभळीच्या झाडांची साल काढणारी टोळी सक्रिय आहे. हातभट्टी दारू बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये देशी बाभूळ झाडाची साल महत्त्वाचा घटक आहे. बेकायदा हातभट्टीची दारू काढणारे व्यावसायीक देशी बाभळीची साल ५० रुपये किलोने घेतात. गावोगावी असणाºया या अवैध दारूधंद्यामुळे देशी बाभळीच्या झाडावर मात्र संक्रात आली आहे. मद्यपीदेखील विनासायास पैसे मिळत असल्याने बाभळीची साल काढून अवैध दारू व्यावसायीकांना विकत आहेत.  त्यामुळे बारामती-इंदापूर  राज्यमहामार्गाच्या कडेने असणारी झाडे धोक्यात आली आहेत. 

४रस्त्याच्या कडेने असणारी संपूर्ण वृक्षसंपदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची आहे.  मागील दोन महिन्यांपूर्वी लासुर्णे (ता. इंदापूर) परिसरातील याच महामार्गाच्या कडेला असणारा वटवृक्ष मानवनिर्मित आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.  याबाबत वृत्तपत्रातून बातमी देखील प्रसिद्ध झाली. मात्र, संबंधितांना केवळ नोटीस देण्यापलीकडे बांधकाम विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या माथेफिरूचे धाडस वाढू लागले आहे. येथील झाडांना नुकसान पोहोचवणाºयांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. ..........ज्या ठिकाणी झाडांना इजा पोहोचवली गेली आहे, तेथे पाहणी करण्यासाठी कर्मचाºयांना पाठविणार आहे. तसेच, या रस्त्याच्या कडेने असणाºया झाडांना इजा पोहोचणार नाही, याची देखील काळजी घेऊ.- पी. व्ही. पंडित, उपअभियंता, भिगवण सार्वजनिक बांधकाम उपविभाग 

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीhighwayमहामार्गIndapurइंदापूरtheftचोरी