Baramati bypoll election: बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पूर्ण ताकतीने काम करावे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 12:31 IST2026-04-14T12:31:43+5:302026-04-14T12:31:52+5:30

Baramati bypoll election: महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी मतदारांना केंद्रापर्यंत आणा. इथे आपल्याला ताकदीने काम करायचे आहे, असे चव्हाण म्हणाले.

Baramati bypoll election BJP should work with full strength in the backdrop of Baramati by-election: BJP state president Ravindra Chavan | Baramati bypoll election: बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पूर्ण ताकतीने काम करावे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

Baramati bypoll election: बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पूर्ण ताकतीने काम करावे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

बारामती : बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने काम करावे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा मोठा विजय व्हावा यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजवावी, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ भाजपच्या बूथ प्रमुखांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. आमदार राहुल कुल, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हाध्यक्ष शेखर वढाणे, बाळासाहेब गावडे, रंजनकुमार तावरे, वासुदेव काळे, प्रवीण माने यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, दुर्दैवी प्रसंगानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. अजितदादांच्या जाण्याने बारामतीचे आणि राज्याचे मोठे नुकसान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने प्रचार करण्याची सूचना केली आहे. त्यांच्या सूचनेनुसारच हा मेळावा घेतला जात आहे. ग्रामीण भागात बऱ्याच वेळा छोट्या निवडणुका, त्या भागातील संस्थांच्या निवडणुका होतात. त्या निवडणुकांमध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात निवडणूक लढतात. यामुळे काही वेळा कटुता निर्माण होते, संभ्रम निर्माण होतो. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने कटुता विसरली गेली पाहिजे. मतदानाचा टक्का वाढविण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे.

दहा दिवसांत बूथ स्तरावर कार्यकर्त्यांनी जावे. देशात आणि राज्यात मोदी व फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्षाला मोठे यश मिळते आहे. ही निवडणूक फडणवीस यांच्या नेतृत्वात होत आहे. त्यामुळे यशाची जबाबदारी आपली आहे. पवार यांचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवा. निवडणुकीत समोरचे उमेदवार ताकदीचे नाहीत; परंतु गाफील राहू नका. महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी मतदारांना केंद्रापर्यंत आणा. इथे आपल्याला ताकदीने काम करायचे आहे, असे चव्हाण म्हणाले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवार तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज बारामतीत दाखल झाले. यावेळी विमानतळावर युवा नेते जय पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Web Title : बारामती उपचुनाव जीतने के लिए भाजपा का पूरा जोर, पूर्ण शक्ति का आग्रह।

Web Summary : रवींद्र चव्हाण ने बारामती उपचुनाव में सुनेत्रा पवार की जीत के लिए भाजपा कार्यकर्ताओं से पूरी ताकत से काम करने का आग्रह किया। उन्होंने मतदाता मतदान बढ़ाने और फडणवीस के नेतृत्व पर प्रकाश डाला। चव्हाण ने एकता पर जोर दिया, पिछली कटुता को भुला दिया, और मतदाताओं को मतदान केंद्रों तक पहुंचाना सुनिश्चित किया।

Web Title : BJP focuses on Baramati bypoll win, urges full strength.

Web Summary : Ravindra Chavan urged BJP workers to work with full strength for Sunetra Pawar's victory in Baramati bypoll. He emphasized increasing voter turnout and highlighted Fadnavis' leadership. Chavan stressed unity, forgetting past bitterness, and ensuring voters reach polling centers.