शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बालगृहाला मिळणार अधीक्षक!

By admin | Updated: April 7, 2015 05:35 IST

शासकीय वरिष्ठ मुलींच्या बालगृहात महिना अखेरपर्यंत वर्ग २ चे निवासी अधीक्षकपद नियुक्त केले जाणार असल्याची माहिती महिला व

शिरूर : शासकीय वरिष्ठ मुलींच्या बालगृहात महिना अखेरपर्यंत वर्ग २ चे निवासी अधीक्षकपद नियुक्त केले जाणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त राजेंद्र चव्हाण यांनी यशास्विनी सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या शिष्टमंडळास दिली़ ‘लोकमत’ने या प्रश्नी सातत्याने आवाज उठवल्याचा ऊहापोह शिष्टमंडळाने यावेळी केला़बालगृहात २००८ पासून वर्ग-२ चे अधीक्षकपद रिक्त असून, यामुळे मुलींच्या समस्यांत सातत्याने भर पडत असल्याबाबत तसेच मागील वर्षी (२०१४) दोन गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याबाबत शिष्टमंडळाच्या वतीने चव्हाण यांना अवगत करण्यात आले़ याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात याचा उल्लेख करताना वर्ग-२ चे अधीक्षकपद तत्काळ नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली़ या वेळी बोलताना फाउंडेशनच्या प्रमुख दीपाली शेळके म्हणाल्या, की अनाथ निराधार घटक असलेल्या बालगृहातील मुलींबाबत शासन प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार न केल्याने बालगृहात लैंगिक अत्याचाराची घटना घडली़ मुलींच्या सुरक्षिततेबाबत निवासी अधीक्षिका अत्यावश्यक असताना गेली सात वर्षे हे पद रिक्त ठेवण्यात आलं़ सात वर्षांपासून या बालगृहात वर्ग-३च्या अधीक्षिकेची नियुक्ती असून, त्या निवासी राहात नसल्याचे वास्तव आहे़निवासी अधीक्षिका नसल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनेकदा ऐरणीवर आला़ कर्वेनगर येथील दोन मुली या बालगृहात दाखल झाल्यानंतर त्या काही दिवसांतच भरदिवसा बालगृहातून पळून गेल्याची घटना घडली होती़याप्रकरणी तत्कालीन अधीक्षिका व काळजीवाहकास निलंबितही करण्यात आले होते़ हा प्रकार केवळ निवासी अधीक्षिका नसल्याने घडला. असा प्रकार घडूनही शासन वर्ग - २चे अधिक्षकपदाबाबत गंभीर नव्हते. याबाबत लोकमतने वारंवार आवाज उठविला. शेळके यांच्यासह नम्रता गवारी, संगीता मल्लाव, शशिकला काळे, सुरय्या पठाण आदी फाउंडेशनच्या पदाधिकारी या वेळी उपस्थित होत्या़ (वार्ताहर)