येरवड्यात पोलीस कर्मचार्‍यावर सराईत गुन्हेगारांकडून प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:50 PM2020-03-11T12:50:07+5:302020-03-11T12:51:16+5:30

आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळासह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Attack on police in Yerawada by criminal | येरवड्यात पोलीस कर्मचार्‍यावर सराईत गुन्हेगारांकडून प्राणघातक हल्ला

येरवड्यात पोलीस कर्मचार्‍यावर सराईत गुन्हेगारांकडून प्राणघातक हल्ला

Next
ठळक मुद्देहल्ला करून हल्लेखोर फरार,  एकास अटक

पुणे : होळी व धुलिवंदनाच्या निमित्त सराईत गुन्हेगार तपासणी करत असताना रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी गुन्हे शाखेच्या पोलीस  कर्मचार्‍याना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत धारदार शस्त्राने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना मंगळवारी रात्री येरवड्यात घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी ४ सराईत आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळासह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यातील एका सराईत गुन्हेगाराला येरवडा पोलिसांनीअटक केली आहे.
या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस शिपाई सागर उर्फ विठ्ठल अनिल घोरपडे (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सराईत गुन्हेगार मोसिन उर्फ मोबा बडे साहेब शेख, आदिल हमीद शेख,  रियाज उर्फ बबलू जिडगे, मोईन  (पूर्ण नाव माहित नाही सर्व रा. पर्णकुटी पायथा, येरवडा) या चौघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन यातील आरोपी रियाज जिडगे याला अटक करण्यात आली आहे. 
 होळी व धुलिवंदनच्या निमित्त येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या वतीने येरवडा परिसरातील सराईत  रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी सुरू होती. मंगळवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास पर्णकुटी पायथ्याजवळ गुन्हे शाखेचे पोलिस शिपाई सागर घोरपडे हे आरोपींचा शोध घेत होते. याच वेळी  रेकॉर्डवरील सराईत आरोपी मोसिन ऊर्फ मोबा शेख व त्याचे इतर साथीदार त्यांना समोर दिसून आले. त्यांनी त्यांची चौकशी सुरू केली असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. दरम्यान पोलीस शिपाई घोरपडे एकटेच असल्यामुळे सराईत गुन्हेगारांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जवळ असलेल्या घातक शस्त्राचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली व तेथून पसार झाले. पोलीस शिपाई घोरपडे यांनी याची माहिती येरवडा पोलिसांना दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देसाई,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख, गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणी  येरवडा पोलिसांनी सराईत आरोपींकडून पोलिस शिपाई सागर घोरपडे यांना तीक्ष्ण हत्याराने धमकावत जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यातील आरोपी रियाज जिडगे  याला अटक करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगाराने पोलीस कर्मचाºयावर हल्ला केल्याच्या घटनेमुळे येरवडा परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. या गंभीर घटनेची नोंद वरिष्ठ पोलिस अधिकाºयांनी घेतली असून सराईत आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश भांगे करीत आहेत.  
 गुन्हे शाखेतील पोलीस शिपाई सागर घोरपडे हे पुणे शहर पोलीस दलातील एक गायक म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे. या गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार मोसीन शेख हा शरीरा विरुद्धचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर येरवडा पोलिस स्टेशन सह पुणे शहर हद्दीत विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. 
 गुन्हे शाखेच्या युनिट चार मध्ये ते कार्यरत असून येरवड्यात सराईत गुन्हेगार कडून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची नोंद वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घेतली आहे. याप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.

Web Title: Attack on police in Yerawada by criminal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.