आमची मुलं सुरक्षित आहेत का? आजोबाकडून दारूच्या नशेत चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यात रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 09:56 IST2026-05-06T09:53:58+5:302026-05-06T09:56:09+5:30

संतापजनक घटनेतून कोणालाच पोलिसी खाक्याचा आणि कायद्याचा धाक राहिला नसल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे

Are our children safe? Grandfather attempts to a drunken child roadblock in Pune | आमची मुलं सुरक्षित आहेत का? आजोबाकडून दारूच्या नशेत चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यात रास्ता रोको

आमची मुलं सुरक्षित आहेत का? आजोबाकडून दारूच्या नशेत चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, पुण्यात रास्ता रोको

पुणे : पुणे शहरातील पर्वती पायथा परिसरातील जय भवानी नगर येथे अत्यंत संतापजनक व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच आजोबांकडून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.आरोपीचे नाव अंबादास यलम्मा जाधव (वय अंदाजे 62 वर्षे, रा. जय भवानी नगर) असे असून तो पीडित मुलीचा आजोबा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या आजोबावर  लैंगिक अत्याचार करणाऱ्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटना घडत असताना परिसरातील नागरिकांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोपीला पकडले आणि संतप्त जमावाने त्याला चोप दिला. या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी निलायम पूल ते पर्वती पायथा दरम्यान रास्ता रोको आंदोलन केले. नसरापूर येथील अलीकडील घटनेमुळे आधीच संतप्त असलेले नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. दरम्यान, पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेची आई पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. 

काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका ५४ वर्षीय नराधम आजोबाने आपल्या अवघ्या ३ वर्षाच्या नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नसरापूर येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या केल्याचे प्रकरण घडले. चाकण मध्येही तीन वर्षाच्या मुलावर अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार करून त्याचा खून केला. या प्रकरणाने अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे. या वाढत्या घटनांमधून आता कुणालाच पोलिसी खाक्याचा आणि कायद्याचा धाक राहिला नसल्याचे दिसत आहे.

आरोपीला ताब्यात घेतले आहे. मुलीला ससूनला तपासणीसाठी पाठवले आहे. नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन लवकर आरोपीला शिक्षा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू.- रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त

ही विकृती येते कुठून? 

पीडोफिलिया हा एक गंभीर मानसिक आजार असून, समाज या आजाराने ग्रासला आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या प्रौढ व्यक्तीला लहान मुलांविषयी लैंगिक आकर्षण वाटते. ही गंभीर मानसिक स्थिती असून, अनेकदा अनुचित प्रकार उघड झाल्यानंतरच ही बाब समाेर येते. याचाच प्रत्यय मागील दाेन दिवसांत घडलेल्या काही घटनांमधून आला आहे. असे प्रकार घडल्यानंतर काही काळ तीव्र संताप व्यक्त केला जाताे आणि पुन्हा विषय साेडून दिला जाताे. यापुढे असे प्रकार घडू नये म्हणून ठाेस काही केले जात नाही. असे प्रकार राेखायचे असतील तर सरकारने हेल्पलाइन सुरू केली पाहिजे. ‘पीडोफिलिया’ग्रस्तांसाठी ओपीडी सुरू करून उपचार करणे. ही माहिती गाेपनीय ठेवणे, समाजात या आजाराबाबत जागृती करणे, लैंगिक शिक्षण देणे, विविध वेबसाइट लाॅक करणे आवश्यक आहे. शाळा, समाज आणि सरकार या तिन्ही पातळीवर उपाययाेजना केल्या पाहिजेत. - डाॅ. निकित कासार, मनाेविकार तज्ज्ञ

Web Title : दादा द्वारा नशे में बच्ची से छेड़छाड़ का प्रयास, आक्रोश, सड़क जाम

Web Summary : पुणे: दादा द्वारा पोती से छेड़छाड़ के प्रयास से आक्रोश। स्थानीय लोगों ने हस्तक्षेप किया, विरोध प्रदर्शन और सड़क जाम। आरोपी गिरफ्तार, पीड़िता का इलाज जारी। हाल की घटनाएं चिंताजनक प्रवृत्ति दर्शाती हैं।

Web Title : Grandfather's Drunken Attempted Assault on Child Sparks Outrage, Road Block

Web Summary : Pune: Outrage after a grandfather allegedly assaulted his granddaughter. Locals intervened, leading to protests and road blockages. The accused is arrested, and the victim is receiving medical care. Recent similar incidents highlight a disturbing trend.