शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आंतरजातीय विवाह योजनेसाठी ऑनलाईन अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 7:27 PM

समाज कल्याण विभागातर्फे गेल्या काही वर्षांपासून आंतरजातील विवाह करणाऱ्या दाम्पत्याला रोख रक्कम दिले जाते.

पुणे : राज्याच्या समाज कल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र,सध्या ऑफलाईन पध्दतीने स्वीकारले जात असल्यामुळे आंतरजातील विवाह योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होत आहे.त्यामुळे समाज कल्याण विभागाने या योजनेसाठी ऑनलाईन स्वरुपातील अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून येत्या महिन्याभरात ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देले जाणार आहेत.  समाज कल्याण विभागातर्फे गेल्या काही वर्षांपासून आंतरजातील विवाह करणाऱ्या दाम्पत्याला रोख रक्कम दिले जाते. अनुसुचित जातीतील मुलाने इतर दुस-या जातीतील मुलाशी किंवा मुलीने इतर जातीतील मुलाशी विवाह केल्यास शासनाकडून अनुदान म्हणून रोख रक्कम दिली जाते.गेल्या काही वर्षात या रक्कमेत टप्प्या-टप्प्याने वाढ करण्यात आली असून सध्या आंतरजातील विवाह करणाऱ्या दामपत्त्याला 50 हजार रुपये दिले जातात. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित दामपत्त्याला जिल्हा परिषदेतील समाज कल्याण कार्यालयाकडे फेऱ्या माराव्या लागतात. तसेच या योजनेसाठी दाखल केलेला अर्ज एकाच गोष्टीसाठी तीन अधिकाऱ्यांकडे जातो. परिणामी दामपत्त्याला योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होतो. त्यामुळेच समाज कल्याण विभागाने ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.पुणे विभागीय समाज कल्याण विभाग कार्यालयाकडे आंतरजातील विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्षभरात सुमारे एक हजार दांपत्यचे अर्ज येतात.रक्कम मिळण्यास विलंब होत असल्यामुळे काही दाम्पत्य अर्ज करणे टाळतात. मात्र,समाज कल्याण विभागाने त्यावर मार्ग काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.-----------आंतरजातील विवाह करणा दामपत्त्याला लवकरात लवकर शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी समाज कल्याण विभागातर्फे ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत.सध्या याबाबतचे काम सुरू असून पुढील महिन्यापासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जातील.कागदपत्रांची तपासणी करून लाभधारकाच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल.एकाच व्यक्तीने दोन वेळा योजनेचा लाभ घेऊ नये, यासाठी लाभधारकाचा आधार क्रमांक घेण्यात येईल.- अविनाश देवसटवार,उपायुक्त, समाज कल्याण प्रादेशिक कार्यालय,पुणे.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्न