शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण ;आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना सहा मार्चपर्यंत कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 20:57 IST

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी अटक विधान परिषद सदस्य अनिल भोसले यांच्यासह चौघांची विशेष न्यायालयाने ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. गोसावी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

ठळक मुद्दे71 कोटी 78 लाख 87 हजारांचा अपहारशिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी अटक विधान परिषद सदस्य अनिल भोसले यांच्यासह चौघांची विशेष न्यायालयाने ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. गोसावी यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे.याप्रकरणी योगेश लकडे (वय ३९, रा. आंबेगाव-नºहे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आमदार अनिल शिवजीराव भोसले (वय ५५, रा. बाणेर रस्ता), सूर्याजी पांडुरंग जाधव (वय ६९, रा. कमला नेहरू पार्क), तानाजी दत्तू पडवळ (वय ५०, रा. तापकीरनगर, काळेवाडी), शैलेश संपतराव भोसले (वय ४७, रा. नीलज्योती सोसायटी, गोखलेनगर) अशी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. भोसले हे बँकेचे अध्यक्ष, संचालक असताना, जाधव संचालक होते. तसेच पडवळ हे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शैलेश भोसले हे बँकेचे मुख्य हिशेब तपासनीस होते.फिर्यादींच्या कंपनीची भोसले बँकेच्या लेखापरीक्षणासाठी नेमणूक केली होती. तसेच, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने या कंपनीला बँकेच्या रोख शिल्लक रकमेबाबत पडताळणी करण्यास सांगितले होते. या वेळी बँकेकडे ७१ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपये रोख असल्याचे कागदोपत्री दाखविले. तसेच ही रक्कम बँकेच्या मुख्य शाखेकडे पाठविण्यात आलेल्याचे दाखविले; मात्र मुख्य कार्यालयात रोख रक्कम ठेवण्याची सोय नसताना कागदोपत्री मुख्य कार्यालयात पाठविल्याचे दाखविले. सर्वांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सुमारे ७१ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपयांचा अपहार असून ही रक्कम त्यांनी स्वत:च्या फायद्याकरिता वापरली असल्याचे त्यांनी या वेळी न्यायालयात सांगितले. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या अपहार प्रकरणात आता कलमवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम हे कलम वाढविण्यात आले आहे. १,१८७ ठेवीदारांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या असून एकूण रक्कम ५२ कोटी ९२ लाख ९१ हजार १८६ रुपये आहे.  बँकेत झालेल्या गैरकारभाराविषयी त्यांच्याकडे चौकशी करायची आहे, आरोपींची बँक खाती, स्थावर आणि जंगम मालमत्तेविषयी माहिती घ्यायची आहे, आरोपींनी या रकमेचा वापर कशाकरिता केला, याची माहिती घ्यायची आहे.  गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे आरोपींकडून हस्तगत करायची आहेत, या बँकेतील गुंतवणूकदार, ठेवीदारांना त्यांची रक्कम परत दिली गेली आदी तपास करायचा असल्याने पठारे यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. तर, आरोपींच्या वतीने एस. के. जैन, हर्षद निंबाळकर, बिपीन पाटोळे, ऋषिकेश गाणू आणि यशपाल पुरोहित यांनी बाजू मांडली.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदार