शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘मतदारराजा जागा हो’चा गजर

By admin | Updated: February 19, 2017 05:09 IST

मूलभूत कर्तव्य असूनही मतदारांकडून मतदान करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे शहरी भागातील मतदानाचा टक्का खूप कमी असतो. शहरात आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये

पुणे : मूलभूत कर्तव्य असूनही मतदारांकडून मतदान करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे शहरी भागातील मतदानाचा टक्का खूप कमी असतो. शहरात आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये मतदान ५५ टक्क्यांहून पुढे गेलेले नाही. हे चित्र बदलण्यासाठी निवडणूक यंत्रणांनी यंदा कंबस कसली असून, ‘मतदारराजा जागा हो’चा गजर सर्वत्र होत आहे. जाहिराती, पथनाट्य, फलक, पोस्टर्स अशा विविध माध्यमांतून मतदानाविषयी जनजागृती केली जात आहे.राज्यात महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर, राज्य निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती अभियान सुरू केले. ग्रामीणभागापेक्षा शहरी भागात मतदान कमी होत असल्याने येथील मतदारांकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार स्थानिक निवडणूक यंत्रणांकडून अधिकाधिक मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. पुणे शहरात आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये ५५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालेले नाही. हा टक्का वाढविण्यासाठी मतदारांना आवाहन करणाऱ्या विविध जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत. शहरातील विविध ठिकाणी ५५ होर्डिंग, महत्त्वाच्या रस्त्यांवरील ७७ मार्गफलक, तसेच ३७ हजार पोस्टर्स लावण्यात आले आहेत. तसेच प्रसिद्ध व्यक्तींकडून आवाहन करणाऱ्या चित्रफितीही तयार करून दाखविल्या जात आहेत. (प्रतिनिधी)सुमारे ५० हजार पत्रकांचे वाटपसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना, तसेच इतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडूनही पथनाट्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी मतदानवाढीसाठी जनजागृती केली जात आहे. सुमारे १५ गट त्यासाठी काम करीत आहेत. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांकरवी त्यांच्या पालकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. सुमारे ५० हजार पत्रके वाटण्यात आली आहेत. पीएमपी बस, सोसायट्या, रुग्णालयांबाहेर पोस्टर्स लावण्यात आली आहेत. विविध ठिकाणी नागरिकांच्या माहितीसाठी उपक्रमही राबविले जात आहेत. अधिकाधिक मतदारांनी मतदान हक्क बजावण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जनजागृतीमुळे सकारात्मक चित्र पाहायला मिळेल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.