शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद, हैदराबादनंतर आता पुण्यातील 'सिरम' इन्स्टिटयूटमध्ये दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 17:47 IST

कोरोनावरील लसीची निर्मिती करत असलेल्या 'सिरम'कडे सध्या जगाचं लक्ष लागून आहे...

पुणे : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला पोहोचले आहेत. सकाळी 12:30 ला हा दौरा आयोजिला होता मात्र भारतामध्ये अहमदाबाद इथल्या झायडस बायोटेक पार्क, हैदराबाद इथल्या भारत बायोटेक आणि पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट असा हा आजचा एकूण दौरा आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सायंकाळी 4:45 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहे. 'सिरम'कडे सध्या जगाचं लक्ष लागून आहे. कारण लस उत्पादनाची जगातील सर्वात मोठी क्षमता सीरमकडे आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केलेल्या कोरोनावरील लसीचं उत्पादन करण्याचे हक्क सीरम इन्स्टिट्यूटनं मिळवले आहेत. या लसीच्या चाचण्यांचे विविध टप्पे जाणून घेण्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हा दौरा करत आहेत. खूप कमी वेळेसाठी म्हणजेच तासाभराचा हा दौरा आहे. ही कोरोनाची लस लोकांपर्यंत कधीपर्यंत पोहोचू शकते आणि कोणत्या माध्यमातून पोहोचू शकते हे कदाचित या दौऱ्यानंतर स्पष्ट होऊ शकेल. कारण ही कोरोना लस कुणाला मोफत उपलब्ध होईल का? किती कालावधीत ही लस उत्पादित होईल? किती प्रमाणात उत्पादित होईल? याची उत्तरं कदाचित पंतप्रधानांच्या या सीरम इन्स्टिट्यूटच्या दौऱ्यानंतर मिळू शकतील. या दौऱ्यानंतर पंतप्रधान थेट दिल्लीला जाणार आहे. सध्या कोरोनाची यशस्वी लस उत्पादित होणं जगासाठी सगळ्यात प्राथमिक बाब होऊन बसली आहे आणि जर सीरममध्ये या लसीचं  उत्पादन योग्य पद्धतीने आणि देशाच्या गरजेच्या दृष्टीने झालं तर पुण्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा असेल. आणखी महत्त्वाचं म्हणजे कोरोनाची लस आता शेवटच्या टप्प्याला याला आहे. तेव्हा ही लस स्टोअर करण्याच्या दृष्टीने उभे करावे लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आणि सीरमशी सरकारला लस वितरणाच्या दृष्टीने करावा लागणारा खर्च याविषयीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊ शकतात. जगभराचं कोरोना लस उत्पादन सीरम मध्ये होऊ शकतं. त्यामुळेही पुण्यातलं  सीरम इन्स्टिट्यूट आणि आजचा पंतप्रधान यांचा सीरम दौरा हा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.