शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकरसाठी पुण्यातून एसटीच्या जादा बसचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:58 IST

भाविकांच्या सुविधेसाठी पुणे एसटी विभागाकडून शिवाजीनगर, नारायणगाव आणि राजगुरूनगरसह १२ आगारातून जादा गाड्यांचे नियोजन केले आहे

पुणे : येत्या दोन दिवसांनी श्रावण सुरू होत आहे. श्रावणात श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी पुणे जिल्ह्यासह विविध राज्यातून भाविक पुणे जिल्ह्यात येतात. या भाविकांच्या सुविधेसाठी पुणे एसटी विभागाकडून शिवाजीनगर, नारायणगाव आणि राजगुरूनगरसह १२ आगारातून जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले.

येत्या २५ जुलै पासून श्रावण सुरू होत असून, श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मोठी यात्रा भरते. पहिला श्रावणी सोमवार २८ जुलै रोजी असून, शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने दोन दिवस अधीपासूनच भाविकांची भीमाशंकर मंदिर परिसरात मोठी गर्दी होते. तर उत्तर भारतीयांचा श्रावणी सोमवार दि. १४ जुलै पासून सुरू झाल्यामुळे भीमाशंकरला भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, हे भाविक महाराष्ट्रासह विविध राज्यातून पुण्यात येतात. त्या भाविकांना भीमाशंकरला जाण्यासाठी शिवाजीनगर आगारातून १० तर पुणे विभागातील शिरूर आणि एमआयडीसी आगार वगळता अन्य सर्व आगारातून एकूण ४६ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

दि. २८ जुलै, दि. ४, ११ आणि १८ आॅगस्ट रोजी श्रावणी सोमवार आहे. तर त्याअधीच शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस त्यामुळे आठवड्यातील पाच दिवस (शुक्रवार ते मंगळवार) जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच बारामती येथील सोमेश्वर यात्रेसाठीही बारामती येथून ६ आणि एमआयडीसी येथून ४ असे एकूण १० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेBhimashankarभीमाशंकरShravan Specialश्रावण स्पेशलSocialसामाजिक