शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
3
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
4
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
5
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
6
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
7
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
8
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
9
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
10
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
11
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
12
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
14
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
15
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
16
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
17
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
18
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
19
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
20
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
Daily Top 2Weekly Top 5

Pune: २ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई; सायलेन्सरवर चालवला बुलडोझर, २८ लाखांचा दंड ठोठावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 15:57 IST

शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बुलेटला फटाक्यासारखा आवाज काढणारे सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज काढला जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या

पुणे: कर्णकर्कश आवाज काढणारे सायलेन्सर बसवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या बुलेटस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या सायलेन्सरचा वापर करणाऱ्या दोन हजार ८२२ वाहनचालकांवर कारवाई केली. यावेळी पोलिसांनी बुलेटला बसवलेले ९०० सायलेन्सर काढून टाकले. येरवड्यातील वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयात बुधवारी ९०० सायलेन्सरवर बुलडोझर चालवण्यात आला. - तसेच वाहनचालकांवर २८ लाख १७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बुलेटला फटाक्यासारखा आवाज काढणारे सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज काढला जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. शाळा, महाविद्यालये, रुग्णालयांच्या परिसरात अशा प्रकारचे आवाज काढणाऱ्या बुलेटस्वारांमुळे नागरिक विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना त्रास व्हायचा. वाहतूक पोलिसांकडे याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कर्णकर्कश हाॅर्नचा वापर करणारे दुचाकीस्वार, तसेच फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाई केली,’ अशी माहिती अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली. यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव उपस्थित होते. सायलेन्सरमध्ये फेरफार करून देणाऱ्या गॅरेजचालकांविरोधातदेखील कारवाई केली जाणार आहे. अशा गॅरेजचालकांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला.

फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या सायलेन्सरचा, तसेच कर्कश हाॅर्नचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात यापुढील काळात नियमित कारवाई करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. - मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Cracks Down on Loud Bullet Bikes, Bulldozes Silencers

Web Summary : Pune police acted against noisy Bullet bikes, crushing 900 modified silencers with a bulldozer. Over 2,822 riders were fined ₹28 lakhs for noise pollution. Action will be taken against garages modifying silencers.
टॅग्स :PuneपुणेbikeबाईकPoliceपोलिसpollutionप्रदूषणMONEYपैसाSenior Citizenज्येष्ठ नागरिकFamilyपरिवारHomeसुंदर गृहनियोजन