शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आसावरी जगदाळे यांना मोठा दिलासा; पुणे महापालिकेत नोकरी, महापौरांच्या हस्ते दिले नियुक्ती पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:48 IST

Pahalgam Attack Survivor: राज्य सरकारने आसावरी यांच्यासाठी विशेष बाब म्हणून वर्ग-२ (प्रशासकीय अधिकारी) पदाला मंजुरी देण्याचे निश्चित केले आहे.

पुणे: काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांनी आपला जीव गमावला होता. या घटनेनंतर गेल्या वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या जगदाळे कुटुंबाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवेत वर्ग-२ (प्रशासकीय अधिकारी) पदाची नोकरी दिली आहे. पुणे महापालिकेत महापौर मंजुषा नागपूरे आणि सभागृह नेते गणेश बिडकर आणि आयुक्त नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत आसावरी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आसावरीचे फोनवरून शुभेच्छा देत अभिनंदन केले.  

पहलगाम दुर्घटनेनंतर जगदाळे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. पती गमावल्याने प्रगती जगदाळे आणि पिता गमावल्याने आसावरी यांच्यावर कोसळलेल्या दुःखाच्या प्रसंगी, शिंदे यांनी या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी आसावरीला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. प्रशासकीय प्रक्रियेत काही काळ विलंब झाला असला, तरी उपमुख्यमंत्र्यांनी पुणे महापालिका आयुक्तांशी थेट संवाद साधून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

'विशेष बाब' म्हणून वर्ग-२ पद मिळाले

आसावरी जगदाळे यांनी संगणक शास्त्रात पदवी आणि मानव संसाधन व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या उच्च शिक्षणाचा विचार करून, त्यांच्या पात्रतेनुसार पुणे महानगरपालिकेत समकक्ष पद निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, महापालिका स्तरावर वर्ग-३ किंवा वर्ग-४ ची पदे भरण्याचे अधिकार असतात, मात्र राज्य सरकारने आसावरी यांच्यासाठी विशेष बाब म्हणून वर्ग-२ (प्रशासकीय अधिकारी) पदाला मंजुरी देण्याचे निश्चित केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Relief for Asawari Jagdale: Pune Corporation Job with Mayor's Letter

Web Summary : Asawari Jagdale, daughter of a terror attack victim, receives a Class-II officer job in Pune Municipal Corporation. Chief Minister and Deputy Chief Minister supported her employment after her father's tragic death in Kashmir.
टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाEmployeeकर्मचारीWomenमहिला