शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Metro साठी १० पदांवर ९६ जागा भरणार; उमेदवारांनी Online अर्ज करावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 14:34 IST

वरिष्ठ पदांपासून ते इतर सर्व पदांसाठी २५ हजार ते २ लाखांपर्यंत पगार देण्यात येणार

ठळक मुद्दे२३ सप्टेंबर रोजी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून १४ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

पुणे : पुण्यातील वाहतूककोंडीची समस्या सोडवणायच्या दृष्टीनं मेट्रो प्रकल्प अंमलात आणण्यात आला आहे. शहरात उपनगरांबरोबरच मध्यवर्ती भागातही मेट्रोचं काम जलद्गतीनं सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महामेट्रोच्या वतीनं विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामध्ये १० पदांसाठी तब्बल ९६ जागा भरण्यात येणार असल्याची माहिती पुणे मेट्रोच्या अधिकृत वेबसाइटवरून देण्यात आली आहे.  

पदासाठी लागणारी शैक्षणिकपात्रता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. पुणे हे नोकरीचं ठिकाण असणार आहे.

पुणे मेट्रो रेल्वेत रिक्त जागांमध्ये अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ स्थानक नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ, खाते सहाय्यक या पदांचा समावेश आहे. वरिष्ठ पदांपासून ते इतर सर्व पदांसाठी २५ हजार ते २ लाखांपर्यंत पगार देण्यात येणार आहे. 

पदांसाठी वयोमर्यादा 

मुख्य प्रकल्प व्यवस्थापक - वयोमर्यादा ५३ वर्षेवरिष्ठ उपमहाव्यवस्थापक - वयोमर्यादा ४८ वर्षे उपमहाव्यवस्थापक - वयोमर्यादा ४५ वर्षेसहाय्यक व्यवस्थापक - वयोमर्यादा ३५ वर्षेवरिष्ठ स्थानक नियंत्रक - वयोमर्यादा वय ४० वर्षेवरिष्ठ विभाग अभियंता - वयोमर्यादा ४० वर्षेविभाग अभियंता - वयोमर्यादा ४० वर्षेकनिष्ठ अभियंता -  वयोमर्यादा ४० वर्षेवरिष्ठ तंत्रज्ञ -  वयोमर्यादा ४० वर्षे खाते सहाय्यक - वयोमर्यादा ३२ वर्षे

२३ सप्टेंबर रोजी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून १४ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी पुणे मेट्रो रेल्वेची अधिकृत वेबसाइट www.punemetrorail.org वर गेल्यावर करिअर सेक्शनमध्ये जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकता.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोonlineऑनलाइनGovernmentसरकार