८५ वर्षीय वृद्धेला लोखंडी गजाने मारहाण; चोरट्यांचा थरार, जुन्नर तालुक्यातील संतापजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:18 IST2026-04-16T16:17:31+5:302026-04-16T16:18:15+5:30

चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओढून घेतले, त्यानंतर घरात प्रवेश करून कपाटातून ५ हजार रुपये व चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला

85-year-old woman beaten with iron rod; Thieves shocked, shocking incident in Junnar taluka | ८५ वर्षीय वृद्धेला लोखंडी गजाने मारहाण; चोरट्यांचा थरार, जुन्नर तालुक्यातील संतापजनक घटना

८५ वर्षीय वृद्धेला लोखंडी गजाने मारहाण; चोरट्यांचा थरार, जुन्नर तालुक्यातील संतापजनक घटना

वडगाव आनंद : जुन्नर तालुक्यातील बेल्हे-आळकुटी रोडवरील रानमळा परिसरात गुरुवारी (१६ एप्रिल) पहाटे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करून चोरट्यांनी सुमारे एक तोळा सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. या भीषण हल्ल्यात जिजाबाई गबाजी गुंजाळ (वय ८५) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्या डोक्याला व हाताला मिळून तब्बल २० टाके पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जिजाबाई गुंजाळ या रानमळा परिसरात एकट्याच राहतात. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास त्या घराबाहेर आल्या असता, दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी त्यांच्यावर लोखंडी गजाने हल्ला चढवला. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओढून घेतले. त्यानंतर घरात प्रवेश करून कपाट उचकटले आणि त्यातील ५ हजार रुपये रोख व चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला.

या घटनेपूर्वी चोरट्यांनी परिसरातील इतर तीन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तिथे त्यांना यश आले नाही. अखेर त्यांनी जिजाबाईंच्या घराला लक्ष्य केले. घटनेनंतर जखमी जिजाबाईंना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत.  डोक्यावर गजाने वार झाल्याने २० टाके पडले. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title : जुन्नर में 85 वर्षीय महिला पर हमला, लूटपाट; घटना से आक्रोश

Web Summary : जुन्नर तालुका में 85 वर्षीय महिला पर बेरहमी से हमला किया गया और लूटपाट की गई। चोरों ने लोहे की छड़ से हमला कर सोने के गहने और नकदी चुरा ली। पीड़िता को सिर और हाथ में गंभीर चोटें आई हैं, जिसके लिए 20 टांके लगे हैं। पुलिस जांच कर रही है, मामला दर्ज कर लिया गया है।

Web Title : 85-Year-Old Woman Attacked, Robbed in Junnar; Incident Sparks Outrage

Web Summary : An 85-year-old woman was brutally attacked and robbed in Junnar taluka. Thieves struck her with an iron rod, stealing gold jewelry and cash. The victim sustained serious head and hand injuries, requiring 20 stitches. Police are investigating, and a case has been registered.