शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड रस्ता भागात ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन २० वर्षीय युवतीचा मृत्यू; ट्रक चालक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:12 IST

सिंहगड रोडवरील तुकाईनगर परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार युवतीला धडक दिली, अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती

पुणे : भरधाव ट्रकच्या धडकेत महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील तुकाईनगर परिसरात घडली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सई श्रीकांत भागवत (१९, रा.भन्साळी कॅम्पस, तुकाईनगर, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड) असे मृत्युमुखी पडलेल्या महाविद्यालयीन युवतीचा नावे आहे. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपश्री श्रीकांत भागवत (४८) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सई एस.पी. महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात होती. गुरुवारी (दि. २६) दुपारी ती दुचाकीवरून घरी निघाली होती. सिंहगड रोडवरील तुकाईनगर परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार सईला धडक दिली. अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच, सहायक पोलिस आयुक्त अजय परमार, सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहेत. पोलिस उपनिरीक्षक कांजळे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातDeathमृत्यू