शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

"या" ठिकाणी शाेधण्यात आले 22 लाख संस्कृत शब्दांचे 1 काेटी 10 लाख अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 20:31 IST

पुण्यातील डेक्कन काॅलेजमधील संस्कृत व काेशशास्त्र विभागामध्ये 22 लाख संस्कृत शब्दांचे 1 काेटी 10 लाख अर्थ शाेधण्यात आले आहेत.

राहुल गायकवाडपुणे : पुण्यातील डेक्कन काॅलेजमधील संस्कृत व काेशशास्त्र विभागामध्ये 22 लाख संस्कृत शब्दांचे 1 काेटी 10 लाख अर्थ शाेधण्यात आले आहेत. हजाराे संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करुन तज्ञांनी संस्कृत शब्दांचे अर्थ व त्यांचे संदर्भ शाेधून काढले आहेत. या संस्कृत शब्दांचा विश्वकाेष सुद्दा तयार करण्यात आला असून आत्तापर्यंत याचे 34 खंड प्रकाशित झाले आहेत. 

पुण्यातील येरवडा भागात डेक्कन काॅलेज हे अभिमत विद्यापीठ आहे. यामध्ये पुरातत्व, भाषशास्त्र आणि संस्कृत हे प्रमुख विभाग आहेत. या काॅलेजमध्ये शिक्षणाबराेबरच संशाेधन देखील चालते. याच काॅलेजच्या संस्कृत विभागामध्ये विविध भाषा पंडितांनी 22 लाख संस्कृत शब्दांचे 1 काेटी 10 लाख अर्थ आणि त्यांचे संदर्भ शाेधले आहेत. या ठिकाणी संस्कृत भाषेचा विश्वकाेष तयार करण्यात येत असून या विश्वकाेषाचे आत्तापर्यंत 34 खंड प्रकाशित झाले आहेत. 

या संशाेधनाबाबत डेक्क्न काॅलेजचे प्र-कुलगुरु डाॅ. प्रसाद जाेशी म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून या विभागामध्ये संस्कृत शब्दकाेष प्रकल्प सुरु आहे. 1948 मध्ये या काेषाचा बीजाराेपण झालं. संस्कृत भाषेत जितके ग्रंथ आहेत. त्याचं वाचन सुरवातीला करण्यात आलं. 30 ते 40 अभ्यासकांनी प्रत्येक ग्रंथ मूळापासून वाचून दाेन हजार ग्रंथांमधून शब्दांची निवड केली. यातून 22 लाख शब्द काढण्यात आले. प्रत्येक शब्द काेठून आला, कुठे कुठे वापरण्यात आला याची नाेंद करण्यात आली. त्याचे संदर्भ शाेधण्यात आले. त्याचे 1 काेटी 20 लाख संदर्भ शाेधण्यात आले. या शब्दांच स्क्रिप्टाेरियम डेक्कन काॅलेजमध्ये तयार करण्यात आलं. आज जगात कुठल्याही शब्दावर संशाेधन करायचं असेल तर हे स्क्रिप्टाेरियम हे माेठं संसाधन आहे. अशाप्रकारे या विश्वकाेषाचे 34 खंड डेक्कन काॅलेजकडून प्रकाशित करण्यात आले आहेत.  

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयResearchसंशोधन