शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 21:05 IST

Sharad Pawar: साताऱ्यातील सभेत काही तरुणांनी ८४ वर्षाचा म्हातारा असे फलक धरले होते. ते बघून शरद पवार काय म्हणाले?

Sharad Pawar: साताऱ्यातील कार्यक्रमाला शरद पवार आले, तेव्हा तिथे काही तरुणांच्या हातात फलक बघितले. शरद पवारांचा फोटो आणि ८४ वर्षांचा म्हातारा असे लिहिलेले पोस्टर होते. ते पोस्टर बघून शरद पवारांनी वय कितीही झालं तरी थांबणार नाही, असे म्हणत निर्धार व्यक्त केला. 

फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमावेळी काही तरुण शरद पवारांचे पोस्टर घेऊन उभे होते. 

शरद पवार काय म्हणाले?

कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, "यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना गेट वे ऑफ इंडियाजवळ शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. आज ७० वर्षे होऊन गेली, वारा प्रचंड असताना त्या पुतळ्याला धक्का बसला नाही. आणि इथं शिवाजी महाराजांचा पुतळा हा उद्ध्वस्त होतो? त्याचे चार तुकडे होतात. याचं कारण पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला. तो भ्रष्टाचार सगळ्या ठिकाणी करणं, ही आजच्या राजकर्त्यांची नीती आहे. त्यांच्या हातातून सत्ता काढून घेणं, हेच काम तुम्हाला आणि मला, सगळ्यांना करायचं आहे. तेच काम सबंध महाराष्ट्रात फिरून आम्ही लोक करत आहोत."

'८४ वर्षांचा म्हातारा' शरद पवार म्हणाले...

"आता याठिकाणी काही तरुण मुलं माझा बोर्ड घेऊन उभे होते. माझा फोटो होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं, 84 वर्षांचा म्हातारा. तुम्ही काही काळजी करू नका. अजून लांब बघायचं आहे. ८४ होवो, ९० होवो... हे म्हातारं काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. तु्म्ही त्याची काळजी करू नका. या सगळ्या कामाला तुम्हा सगळ्यांची मदत अंतःकरणापासून होईल. याची खात्री मी बाळगतो", असे भाष्य शरद पवारांनी केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती