शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 06:32 IST

विरोधकांच्या नाकावर टिच्चून लोकसभेत आणि विधानसभेत ३३ टक्के महिला सदस्यांना निवडून देईपर्यंत ही लढाई थांबणार नाही, असा खणखणीत इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विरोधकांना दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: विरोधकांच्या नाकावर टिच्चून लोकसभेत आणि विधानसभेत ३३ टक्के महिला सदस्यांना निवडून देईपर्यंत ही लढाई थांबणार नाही, असा खणखणीत इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विरोधकांना दिला. एक मोर्चा काढून शांत बसलो, तर भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत आणि महिलांना न्याय मिळणार नाही. प्रत्येक महिलेला जागृत करण्याची हीच वेळ असून एक कोटी महिलांच्या सह्या असलेले एक निवेदन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना द्यावे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर भाजपतर्फे मुंबईत वरळीच्या जांबोरी मैदान ते एनएससीआय डोमपर्यंत महिलांचा विराट ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वरळी डोममध्ये करण्यात आला. त्यावेळी फडणवीस बोलत होते.

विरोधकांकडून माझी २०२३ मधील समाजमाध्यमांवरील एक पोस्ट प्रसारित करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. झोपलेल्या व्यक्तीला जागे करता येते, पण सोंग घेतलेल्या व्यक्तीला जागे करता येत नाही. एनडीएकडे बहुमत आहे, हे विरोधकांना माहीत होते. मत दिले नाही, तरी विधेयक मंजूर होणार असल्याने त्यांनी त्याला समर्थन दिले होते आणि महिला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता, पण जनगणना आणि मतदारसंघांची फेररचना करूनच हे विधेयक लागू करायचे, हा या विधेयकाचाच भाग आहे. त्यामुळे तेव्हा विधेयकाला समर्थन दिलेल्या विरोधकांकडून आता मतदारसंघांची फेररचना कशाला? असा सवाल आता करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी निदर्शनास आणले. 

यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री पंकजा मुंडे, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, महापौर रितू तावडे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर व अन्य महिला आमदार, पदाधिकारी उपस्थित होते; तर ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, अशोक उईके हे आमदार कार्यकर्त्यांच्या रांगेत बसले होते.

राज्याचे प्रतिनिधित्व कमी होणार नाही

जनगणना व त्यानंतर फेररचना केल्यास २०२९ मध्ये नव्हे, तर २०३४ मध्येही अंमलबजावणी होईल की नाही, अशी शंका होती. म्हणून पंतप्रधान मोदी यांनी घटनादुरुस्ती विधेयक आणून आधीची (२०११) जनगणना विचारात घेण्याचे ठरवले. आपल्या राज्यांमधील जागा कमी होतील, असा आक्षेप दक्षिणेकडील राज्यांनी घेतला आहे; परंतु सर्व राज्यांच्या जागा ५० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय मोदी यांनी आधीच घेतला असून कुठल्याही राज्याचे संसदेतील प्रतिनिधित्व कमी होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis vows fight for 33% women's representation in legislature.

Web Summary : Devendra Fadnavis declared the fight for 33% women in legislature will continue. He urged women to unite, submit a petition to Rahul Gandhi. Accused opposition of misleading public, clarified census consideration. Assured no state's parliamentary representation will decrease.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणWomen Reservationमहिला आरक्षण