शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 00:15 IST

दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू. पेरूच्या बागेत चिमुरडीचा मृतदेह सापडला.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे बिबट्याने एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर जीवघेणा हल्ला करत तिचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी घडली. ज्ञानेश्वरी विलास मोरे, असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमके काय घडले?

प्राप्त माहितीनुसार, मूळचे कळंबरी (ता. पेठ) येथील रहिवासी असलेले विलास मोरे हे आपल्या कुटुंबासह वलखेड येथील त्र्यंबक बळवंत शिंदे यांच्या शेतात मजुरीचे काम करतात. मंगळवारी सायंकाळी ७ ते ७.३० च्या सुमारास ज्ञानेश्वरी शेतात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली आणि तिला उचलून नेले.

शोधकार्यानंतर मृतदेह आढळला

अचानक घडलेल्या या घटनेमुळे मजुरांच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी आणि मजुरांनी तातडीने आरडाओरडा करत परिसराचा शोध घेण्यास सुरुवात केली. माहिती मिळताच दिंडोरी वनपरिक्षेत्राचे गस्त पथक आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनविभाग, पोलीस आणि ग्रामस्थांनी रात्रभर केलेल्या अथक शोधकार्यानंतर, घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रोशन संजय बोंबले यांच्या पेरूच्या बागेत ज्ञानेश्वरीचा मृतदेह मिळून आला. बिबट्याच्या या हिंस्र हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती वनविभागाने दिली आहे.

परिसरात दहशतीचे वातावरण

या घटनेनंतर वलखेड परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट्याचा वावर शेती परिसरात वाढल्याने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून नरभक्षक बिबट्याला तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून, मृत चिमुरडीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Kills 3-Year-Old Girl in Dindori, Nashik; Area in Mourning

Web Summary : A three-year-old girl was tragically killed by a leopard in Dindori, Nashik. The incident occurred in Valkhed village where the girl's family worked as laborers. After an extensive search, her body was found in a nearby orchard. The community is in shock and fear, demanding the leopard's capture.
टॅग्स :NashikनाशिकLeopard Attackबिबट्याचा हल्ला