शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

खरंच, हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे...!’ जितेंद्र आव्हाड यांची कविता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 06:45 IST

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी ‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे...!’ अशी कविता केली आहे.

मुंबई : गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी ‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे...!’ अशी कविता केली आहे. ठाकरे यांच्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना त्यांनी या कवितेत अनेक मुद्दे मांडले आहेत. विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री काहीही उत्तर देत नसले, तरी महाविकास आघाडी पक्षातील राष्ट्रवादीचे नेते आव्हाड यांनी त्यांच्यावरील टीकेला उत्तर दिल्यामुळे राजकीय चर्चादेखील रंगली आहे.या कवितेत मंत्री आव्हाड यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत न करता पंतप्रधान निधीला मदत केली, इथपासून ते सध्याचा लॉकडाऊन लावताना सगळ्यांशी केलेल्या चर्चेपर्यंत, आव्हाड यांनी या कवितेतून विषय मांडले आहेत.

कधी थाळ्या वाजवायला लावल्या नाहीत...ना कधी मेणबत्या आणि दिवे लावायला लावले...निर्णय घेताना घेतले विश्वासात...विरोधकांचे त्यामुळेच फावले...शांत राहून तो लढत आहेविरोधकांचं खरंच राइट आहे...खरंच... हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!मंदिर उघडा, बाजार उघडाशाळा उघडा ते म्हणाले...परीक्षा पुढे ढकलल्या तरते रस्त्यावर पुन्हा- पुन्हा आले...कोरोना वाढला तर ते आताफक्त सरकारला दोषी ठरवत आहेत...विरोधकांचे खरंच राइट आहे...खरंच... हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!इमान तर विकले नाहीचना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या...कोरोनाचे आकडे लपवले नाहीचखोट्याने न कधी माना झुकल्या...घरी पत्नी आणि मुलगाआजारी असताना तो मात्र लढत आहे...विरोधकांचं खरंच राइट आहे...खरंच... हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!ना कुठे बडबोलेपणाना कशाचा बडेजाव...आठ हजार कोटींचेविमान नको...ना कोणत्या प्रकरणातघूमजाव...जे करतोय ते प्रामाणिकपणेतो करतो आहे...विरोधकांचं खरंच राइट आहे...खरंच... हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!व्यापाऱ्यांचं ऐकून घेतोय...विद्यार्थ्यांचं ऐकून घेतोय...गोरगरीब जनतेलाएकवेळ शिवभोजन मोफत देतोय...निसर्ग चक्रीवादळ, कोरोना संकटशेतकऱ्यांच्या अडचणीयासाठी तो शांततेत लढतो आहे...विरोधकांचं खरंच राईट आहे...खरंच... हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!!ना क्लीन चिट देता आली...ना खोटी आकडेवारी देता आली...निवडणूक काळात तर कधीना अशक्य घोषणा त्याला करता आली...जे होण्यासारखे आहे, तेच तो करतोय...विरोधकांचं खरंच राईट आहे...खरंच... हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!महाराष्ट्राचं मीठ खाऊननिधी पंतप्रधान निधीला ते देताय...ऊठसूठ, सकाळ- संध्याकाळते टीका सरकारवर करताय...तो मात्र टीकेला उत्तर न देतासर्वसामान्यांसाठी झटत आहे...विरोधकांचं खरंच राइट आहे...खरंच... हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे!

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरे