शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

"एकनाथ खडसेंच्या पुनर्वसनाची चिंता कोणीही करू नये"

By ravalnath.patil | Published: October 22, 2020 7:59 PM

jayant patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गुरूवारी बैठक पार पडली.

ठळक मुद्देया बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासह सुप्रिया सुळे, बाळासाहेब पाटील आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणे आदी उपस्थित होते.

मुंबई : भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर केल्यानंतर एकनाथ खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे की त्यांच्याकडे पक्षाची इतर जबाबदारी देण्यात येणार, याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे प्रातिनिधिक स्वरुपात प्रवेश करतील. त्यांच्या पुनर्वसनाची चिंता कोणीही करू नये. याबातचा निर्णय शरद पवार घेतील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गुरूवारी बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळात महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 

एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशाबाबत जयंत पाटील यांना पत्रकारांनी विचारले. यावेळी, एकनाथ खडसे यांच्यासोबत काही संस्थेतील लोक पक्ष प्रवेश करतील. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील काही लोक प्रवेश करणार आहेत. सध्या एकनाथ खडसे प्रातिनिधिक स्वरुपात प्रवेश करतील. त्यांच्या पुनर्वसनाची चिंता कोणीही करू नये. याबाबतचा निर्णय शरद पवार घेतील. कोणत्याही मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या अफवा पसरवू नका. या चर्चांना पूर्णविराम दिला तर बरं होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. यावेळी अजित पवार थोडे आजारी आहेत. त्यांना सर्दीचा त्रास होत आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितले आहे. कोरोना झाला आहे का, याबाबत नेमकी माहिती नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासह सुप्रिया सुळे, बाळासाहेब पाटील आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलeknath khadseएकनाथ खडसेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस