शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी जिंकताहेत' ही तर विरोधकांची अफवा; विश्वास ठेवू नका- पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 13:40 IST

झारखंडमधील सभेत मोदींचं जनतेला आवाहन

रांची: देशातल्या 9 राज्यांमध्ये विधानसभेच्या 71 जागांसाठी मतदान सुरू आहे. एका बाजूला चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू असताना दुसऱ्या बाजूला पुढील टप्प्यांसाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या कोडरमामध्ये आले होते. तीन टप्प्यातल्या मतदानानंतर विरोधक भांबावून गेले आहेत. आता चौथ्या टप्प्यानंतर ते चारीमुंड्या चीत होतील, अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांवर तोफ डागली. विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना केलं. 'मोदी जिंकत आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करण्याची गरज नाही, असं विरोधक म्हणत आहेत. मात्र त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन मी करतो. मोदी जिंकत असतील, तर भरपूर मतदान करा आणि अधिकाधिक मतांनी त्यांना जिंकवा,' असं मोदी जनसभेला संबोधित करताना म्हणाले. याआधीही मोदींनी त्यांच्या सभेत अनेकदा अशा प्रकारे आवाहन केलं होतं. आम्ही निवडणूक जिंकत आहोत. मात्र प्रत्येक ठिकाणी कमळ उमलायला हवं. त्यामुळे नक्की मतदान करा. जेव्हा आमच्या सरकारनं भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली तेव्हा विरोधक चौकीदाराला चोर म्हणू लागले. विरोधकांचं मिशन महाभेसळ सुरू आहे. खिचडी सरकार स्थापन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. घोटाळे करता यावेत, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असं मोदी म्हणाले. देशात खिचडी सरकार आल्यास देश मागे जाईल. त्यामुळे देशात सशक्त सरकार आणा, असं आवाहन मोदींनी केलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJharkhand Lok Sabha Election 2019झारखंड लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदी