शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न, ते निर्दोष सुटणार: गुलाबराव पाटील

By मोरेश्वर येरम | Updated: January 16, 2021 19:12 IST

"धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कुणालाही नाही. मुंडे यांनी याआधीच या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलेलं आहे"

ठळक मुद्देगुलाबराव पाटील यांनी विरोधकांना सुनावलेधनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचं केलं विधानधनंजय मुंडे प्रकरणावरुन गुलाबराव पाटील यांनी केले विरोधकांवरच आरोप

जळगावराज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपवरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर राष्ट्रवादीसह शिवसेना नेतेही धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत. 

"धनंजय मुंडे हे नक्की यातून निर्दोष सुटतील. त्यांचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे", असा थेट आरोप शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ते जळगावमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याबाबत गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारलं असता पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. 

"धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कुणालाही नाही. मुंडे यांनी याआधीच या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांनी आपल्या अपत्यांबाबतही माहिती जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील आरोपात काही तथ्य असेल असं वाटत नाही. ते नक्कीच यातून निर्दोष सुटतील", असं गुलाबराव पाटील म्हणाले. 

एका आठवड्यात तपास पूर्ण होणारराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची आठवड्याभरात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर माजी आमदार कृष्णा हेगडे, मनसेचे नेते मनिष धुरी यांनीही तक्रारदार महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं झालं आहे. त्यात राज्याच्या मंत्र्यावर आरोप केलेले असल्यानं त्याचा तातडीने सोक्षमोक्ष लावण्यासाठी राष्ट्रवादीकडून पावलं उचललं जात आहेत. 

शरद पवार काय म्हणाले?धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मुंडे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. ते म्हणाले की, आम्ही धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत चर्चा केली. त्याचबरोबर त्या महिलेवरही ब्लॅकमेलिंगचे आरोप आहेत. वेगळ्या विचारांचे आणि वेगळ्या भूमिकेचे लोकही एकाच महिलेबाबत बोलत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसीपी दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावे असे आपण सुचविले आहे. चौकशी पूर्ण झाल्यावरच पुढचा निर्णय घेऊ.  

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगावPoliticsराजकारण