शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

पवारांना पहिल्यांदाच मी इतकं संतापलेलं पाहिलं, ते त्र्यागानं बैठकीतून निघाले; राऊतांचा गौप्यस्फोट

By कुणाल गवाणकर | Updated: November 29, 2020 09:24 IST

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण; 'रोखठोक'मधून संजय राऊतांचे गौप्यस्फोट

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्या वर्षी ३७ दिवस राज्यात सत्तानाट्य सुरू होतं. या कालावधीत राजकारणातील डाव-प्रतिडाव राज्यानं पाहिले. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेनं सोडलेली भारतीय जनता पक्षाची साथ, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळवलेला हात, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी, अजित पवारांनी राजीनामा, फडणवीस यांचं कोसळलेलं सरकार आणि उद्धव ठाकरेंचा शीवतीर्थावरील शपथविधी अशा उत्कंठावर्धक घटना या सत्ता नाट्यात घडल्या. या संपूर्ण घटनाक्रमाला वर्ष उलटत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक सदरातून काही गौप्यस्फोट केले आहेत.

संजय राऊतांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा; भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दररोज सकाळी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधणारे संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या सातत्यानं संपर्कात होते. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात झालेल्या एका बैठकीत नेमकं काय घडलं होतं, याची माहिती राऊत यांनी त्यांच्या लेखात दिली आहे. 

कंगना रणौत प्रकरण: महापालिकेची कारवाई बेकायदेशीर कशी?, हे मी शोधतोय; राऊतांची प्रतिक्रिया

'शरद पवार व माझ्यात ३५ दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी हा निव्वळ टाईमपास आहे असा अपप्रचार सुरू झाला. १७ नोव्हेंबरला सकाळी पत्रकारांनी मला विचारले, ''तुमच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे?'' तेव्हा ''आमचा आकडा १७० आहे'' असे मी सांगितले. त्या १७० आकड्याची खिल्ली उडवण्यात आली. तोपर्यंत सरकार स्थापनेसंदर्भात काँगेसचा स्पष्ट होकार आला नव्हता, पण अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. नेहरू सेंटरमधल्या २२ नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली. तेथे खरगे व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी व प्रफुल पटेल धावत गेलो. त्याच बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे श्री. पवार यांनीच सुचवले, पण खरगे, पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला,' असं राऊत यांनी त्यांच्या लेखात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी केलेलं 'ते' विधान ऑन रेकॉर्ड आहे; संजय राऊतांचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास उत्सुक होती. त्यासंदर्भात त्यांची दिल्लीत अमित शहांसोबत बैठकही झाली होती, असा दावा नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'ट्रेडिंग पॉवर' पुस्तकात करण्यात आला. मात्र राऊत यांनी हा दावा खोडून काढला आहे. 'अजित पवारांचा फोन नेहरू सेंटरमधील बैठकीनंतर 'स्विच ऑफ' झाला व दुसऱया दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळ्यात झाले. फडणवीस-अजित पवारांचा शपथविधी सुरू असतानाच एक महत्त्वाचा फोन मला आला, ''तुमचे सरकार बनत नाही. फडणवीस-अजित पवार शपथ घेत आहेत. अजित पवारांनी एनसीपी फोडली. पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्याचे सुप्रिया सुळे यांनी सोशल माध्यमांवर मान्य केले आहे.'' मी त्याक्षणीही सांगितले, ''चार वाजेपर्यंत थांबा. अजित पवारांसोबत गेलेले परत येतील. स्वतः अजितदादाही गुदमरून परत फिरतील.'' हे यासाठीच सांगायचे की, पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार, अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाली अशा प्रकारच्या गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस अशी बैठक झाली व त्यात पहाटेच्या शपथविधीचे 'नाट्य' तयार झाले हे सर्वस्वी चूक आहे,' असा दावा राऊत यांनी केला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवार