शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
3
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
4
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
5
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
8
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
9
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
10
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
11
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
12
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
13
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
14
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
15
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
16
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
17
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
18
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
19
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
20
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
Daily Top 2Weekly Top 5

“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 17:27 IST

MP Sanjay Raut Letter To America President Donald Trump: संजय राऊत यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहिले आहे.

MP Sanjay Raut Letter To America President Donald Trump: एकीकडे अमेरिका इराण यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे वाढलेली महागाई आणि दुसरीकडे भारत आणि अमेरिका यांच्यात होत असलेला करार यावरून भारतातील विरोधक सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतरही विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्चिम बंगालच्या विजयाच्या शुभेच्छा दिल्याचा जाब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विचारला आहे. यासाठी संजय राऊतांनी थेट एक पत्र लिहिले आहे. 

भारतात आता झालेल्या निवडणुका राज्य स्तरावरील असून, हा भारताच्या फेडरल लोकशाहीचा अंतर्गत विषय आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही बाह्य समर्थनाचे विधान अकाली आणि अवाजवी वाटते. ​महत्त्वाची बाब म्हणजे, निवडणूक प्रक्रियेबाबत काही गंभीर विषय समोर आले आहेत. भीतीचे वातावरण, धमक्या देणे आणि दबावतंत्र वापरल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने निःपक्ष काम केलेले नाही, आयोगाची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या फायद्याची होती, अशी धारणा जनमानसात आहे, ज्यामुळे घटनात्मक संस्थांच्या तटस्थतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

विधान करण्यापूर्वी या सर्व बाबींचा विचार केला होता का?

बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्रीय दलांचे जवान तैनात करण्यात आले होते. याबाबत देखील अनेक आरोप करण्यात आले यामुळे मतदारांमध्ये विश्वासाऐवजी दहशतीचे वातावरण निर्माण झाले. ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ​लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका घेणे नव्हे, तर त्या निवडणुका मुक्त, न्याय्य आणि विश्वासार्ह असणे आवश्यक आहे. जेव्हा गंभीर आरोप केले जातात, तेव्हा ते उत्सवाचा नाही तर सखोल चौकशीचा विषय ठरतात. आपण विधान करण्यापूर्वी या सर्व बाबींचा विचार केला होता का?, अशी विचारणा संजय राऊतांनी या पत्रातून केली आहे. 

दरम्यान, संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांच्या राजीनामा न देण्याची भूमिकेचेही समर्थन केले. ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाचाच तो एक भाग आहे. यामध्ये इंडिया आघाडी त्यांच्याबरोबर उभी आहे, असे संजय राऊतांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Raut's letter to Trump: Why congratulate Modi?

Web Summary : Sanjay Raut questions Trump's congratulatory message to Modi on West Bengal victory. He cites election irregularities, biased election commission, and an atmosphere of fear during the polls. Raut supports Banerjee's stance and demands a thorough investigation.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Assembly Electionविधानसभा निवडणूक २०२६Sanjay Rautसंजय राऊतDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका