शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 22:30 IST

1 / 9
टाटा समूहातील 'टायटन' कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारी जबरदस्त तेजी दिसून आली. बीएसई (BSE) वर इंट्राडे दरम्यान टायटनचा शेअर ६ टक्क्यांहून अधिक वधारला आणि ४,६०१.१० रुपयांवर पोहोचला. या उसळीने दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांचीही मोठी लॉटरी लागली असून त्यांच्या संपत्तीत एका झटक्यात १३०० कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.
2 / 9
खरेतर, मार्च २०२६ तिमाहीच्या निकालांच्या घोषणेनंतर कंपनीच्या शेअरमधील ही मोठी वाढ आहे. कामकाजाच्या शेवटी हा शेअर ४.७६ टक्क्यांच्या वाढीसह ४५१३.४० रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४,६०१.१० रुपये इतका आहे.
3 / 9
शेअरहोल्डिंग पॅटर्नचा विचार तरता, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे तब्बल ४७१८४४७० एवढे शेअर्स आहेत. टक्केवारीचा विचार करता, ५.३१ टक्के एवढी हिस्सेदारी.
4 / 9
हा शेअर गुरुवारी BSE वर ४३०८.५० रुपयांवर बंद झालेला हा शेअर शुक्रवारी २९२.६० रुपयांनी वधारला आणि ४६०१.१० रुपयांवर जाऊन पोहोचला. यानंतर रेखा झुंझुंवाला यांची संपत्ती झटक्यात १३८० कोटी रुपयांनी वधारली.
5 / 9
कंपनीच्या नफ्याचा विचार करता, कंपनीला चौथ्या तिमाहीत ११७९ कोटी रुपयांचा एकत्रित नफा झाला. जो गत वर्षाच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी अधिक आहे.
6 / 9
कंपनीचे एकूण उत्पन्नही ४६ टक्क्यांनी वाढले आणि २०३०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तसेच, कंपनीचा इबिट्डा (EBITDA) २८ टक्क्यांनी वाढून १८७५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
7 / 9
महत्वचा गोष्ट म्हणजे, टायटनच्या संचालक मंडळाने आता प्रत्येक शेअरवर १५ रुपये एवढा लाभांश (Dividend) देण्याची शिफारस केली आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने ३४ टक्क्यांहून अधिक, तर पाच वर्षांचा विचार करत, २११ टक्क्यांचा परतावा दिला आहे.
8 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :Rekha Jhunjhunwalaरेखा झुनझुनवालाTataटाटाStock Marketस्टॉक मार्केटshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक