शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
3
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
4
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
5
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
8
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
9
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
10
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
11
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
12
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
13
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
14
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
15
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
16
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
17
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
18
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
19
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
20
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
Daily Top 2Weekly Top 5

“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 19:24 IST

Nashik TCS Case Nida Khan AIMIM: नाशिक TCS प्रकरणात निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथून अटक होताच उद्धवसेनेच्या नेत्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.

Nashik TCS Case Nida Khan AIMIM: नाशिकच्या टीसीएस कंपनीतील अत्याचार व कथित सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात (कार्पोरेट लव्ह जिहाद) छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली. या प्रकरणातील फरार महिला आरोपीला शहरातील नारेगावातून अटक करण्यात आली. यानंतर निदा खानला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तिला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी AIMIM पक्षाचे नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे नेते आक्रमक झाले असून, एआयएमआयएम पक्षावरच बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. 

नाशिक शहरातील चर्चेत असणारे TCS धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणी मुख्य महिला आरोपी निदा खान हिला पोलिसांनी २५ दिवसांनंतर अटक केली. निदा खान पोलिसांना गुंगारा देत छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात लपून बसली होती. निदा खान हिला लपण्यासाठी मदत करत असल्याच्या आरोपाखाली छत्रपती संभाजीनगरचे AIMIM पक्षाचे नगरसेवक मतिन पटेल याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले. आता उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.

AIMIM पक्षावरच बंदी घाला

ज्या ठिकाणावरून निदा खानला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्या परिसरात अनेक अवैध धंदे सुरू आहेत.  भागातील एमआयएमच्या मतीन नावाच्या नगरसेवकालाही अटक करावी. छत्रपती संभाजीनगर नावाचा इम्तियाज जलील यांना पहिल्यापासूनच राग आहे. त्या मुलीला लपवण्यामागे मतीन पटेल आणि त्यांचे बॉस इम्तियाज जलील यांचा हात आहे, असा गंभीर आरोप करत, एमआयएमवर बंदी घालण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, निदा खान ही केवळ एक मोहरा असून याचे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. धर्मांतर करणे आणि मुलींना फसवणे हे प्रकार एमआयएमच्या नेतृत्वात होतात. निदा खान इतर कुठेही न जाता केवळ छत्रपती संभाजीनगरलाच का आली? कारण याचे मास्टरमाइंड इथेच आहेत. नारेगावसारख्या संवेदनशील भागात तिला आश्रय दिला गेला, जिथे अमली पदार्थांचे धंदे चालतात. इम्तियाज जलील यांनी निदा खानसाठी पत्रकार परिषद घेऊन तिला उघड पाठिंबा दिला होता. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी जलील यांची चौकशी झाली पाहिजे. मी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन एसआयटी चौकशीची मागणी करणार आहे, असे शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray Group demands ban on AIMIM after Nida Khan's arrest.

Web Summary : Following Nida Khan's arrest in the Nashik TCS case, Uddhav Sena demands a ban on AIMIM, alleging their involvement in forced conversions. Accusations point to AIMIM leaders aiding Khan, prompting calls for investigation and a ban on the party.
टॅग्स :TCS Nashik CaseTCS नाशिक केसChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv Senaशिवसेनाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलील