West Bengal Assembly Election 2026: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुवेंदू अधिकारी यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याची घोषणा केली. उद्या(८ मे २०२६) त्यांचा शपथविधी पार पडणार असून, राज्यात दोन उपमुख्यमंत्रीही नियुक्त होणार आहेत. दरम्यान, सुवेंदू यांच्याबद्दल सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यांचे खासगी आयुष्य आणि संपत्तीसह विविध गोष्टींची चर्चा होत आहे.
शुभेंदू अधिकारी यांची संपत्ती किती?
विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शुभेंदू अधिकारी यांची एकूण मालमत्ता सुमारे ₹८५.८७ लाख इतकी आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नावावर कोणतेही कर्ज नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेतलेल्या अधिकारींनी प्रतिज्ञापत्रात स्वतःकडे सुमारे ₹१२ हजार रोख रक्कम असल्याचे सांगितले होते. तसेच पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि IDBI बँकेसह विविध बँक खात्यांमध्ये सुमारे ₹७ लाख ठेवी असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
LIC मध्ये मोठी गुंतवणूक
शुभेंदू अधिकारी यांनी अनेक जीवन विमा योजना घेतल्या असून, त्या सर्व LIC च्या आहेत. त्यांच्या एका LIC पॉलिसीमध्ये सुमारे ₹६ लाखांची गुंतवणूक आहे, तर इतर पाच पॉलिसींमध्ये मिळून जवळपास ₹७ लाख गुंतवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे कोणतीही कार किंवा दुचाकी नाही. तसेच सोने-चांदीचे दागिने किंवा मौल्यवान वस्तूंचीही नोंद प्रतिज्ञापत्रात करण्यात आलेली नाही.
सरकारी बचत योजनांवर अधिक भर
बँक ठेवींव्यतिरिक्त शुभेंदू अधिकारी यांनी विविध सरकारी बचत योजनांमध्येही गुंतवणूक केली आहे. त्यांच्या नावावर पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्यात ₹६० हजार, किसान विकास पत्रमध्ये ₹२.६० लाख आणि NSC प्रमाणपत्रांमध्ये जवळपास ₹५ लाख इतकी गुंतवणूक असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय शेअर्स आणि बाँड्समध्ये त्यांनी सुमारे ₹१४ हजारांची गुंतवणूक केली आहे.
साधेपणाची चर्चा
राजकारणातील मोठे नाव असूनही शुभेंदू अधिकारी यांची साधी आर्थिक जीवनशैली सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता, लक्झरी कार किंवा दागिने नसल्यामुळे त्यांच्या प्रतिज्ञापत्राकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
Web Summary : Despite becoming West Bengal's CM, Suvendu Adhikari possesses ₹85.87 lakh in assets, disclosed during elections. He has LIC investments and savings, but no loans, cars, or significant valuables, emphasizing a simple lifestyle.
Web Summary : पश्चिम बंगाल के सीएम बनने के बावजूद, शुभेंदु अधिकारी के पास चुनाव में खुलासा की गई ₹85.87 लाख की संपत्ति है। उनके पास एलआईसी निवेश और बचत है, लेकिन कोई ऋण, कार या महत्वपूर्ण मूल्यवान वस्तुएं नहीं हैं, जो एक सरल जीवन शैली पर जोर देती हैं।