आप्पासाहेब पाटील -
सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये ज.रा. चंडक प्रशाला, बाळे येथील विद्यार्थिनी निकिता अमोल कुचेकर हिने सर्वच विषयांत प्रत्येकी ३५ गुण मिळवत एक वेगळीच नोंद केली आहे.
दरम्यान, निकिताला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान तसेच समाजशास्त्र या सर्व विषयांमध्ये समान ३५ गुण प्राप्त झाले. तिच्या या अनोख्या निकालाची परिसरात चर्चा होत असून मित्र परिवार व शिक्षकांकडून तिचे कौतुक होत आहे. दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयांत बरोबर ३५ टक्के (प्रत्येकी ३५ गुण) मिळवणे ही एक दुर्मिळ आणि आश्चर्यकारक कामगिरी आहे. सोलापूरच्या निकिताच्या ३५ टक्के गुणांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अशा निकालांना अनेकदा "परफेक्ट ३५" किंवा "काठावर पास" म्हणून संबोधले जात असून तो कौतुकाचा विषय ठरत आहे.
Web Summary : Nikita Kusekar from Solapur cleared her 10th grade with 35 marks in all subjects. This unique achievement is being celebrated by her teachers and friends. Her 'perfect 35' score is now a talking point on social media.
Web Summary : सोलापुर की निकिता कुसेकर ने सभी विषयों में 35 अंक प्राप्त कर 10वीं कक्षा उत्तीर्ण की। इस अनोखी उपलब्धि का जश्न शिक्षक और मित्र मना रहे हैं। उनका 'परफेक्ट 35' स्कोर अब सोशल मीडिया पर चर्चा का विषय है।