लग्न झालं की काही मुलीच्या स्वप्नांना पूर्णविराम लागतो असं म्हणतात. कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये ती अडकून जाते. पण अशातच एक घटना सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे, ज्याचं सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे. बिहारमधील एका सासूने जुनाट विचारांना छेद दिला आहे. इतकंच नाही तर आपल्या सुनेच्या अंगावर 'खाकी वर्दी' यावी यासाठी स्वतः स्वयंपाकघरात काम करत आहे. सुनेने पोलीस व्हावं म्हणून ही सासू दररोज पहाटे ५ वाजल्यापासून घर सांभाळते, जेणेकरून तिची सून मैदानावर वर्दीसाठी घाम गाळू शकेल.
“सून नाही, ती तर माझी मुलगीच!”
बिहारच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सून पोलीस भरतीसाठी सराव करायला घराबाहेर पडते, तेव्हा मागे घरची सर्व कामं ही सासू आनंदाने करते. "ही माझी सून नसून माझी मुलगी आहे. तिचं स्वप्न पूर्ण होणं, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे" असं ही माऊली अभिमानानं सांगते. सासूच्या या शब्दांनी सुनेलाही एक वेगळंच बळ दिलं असून घरच्या कामांऐवजी तिला फक्त आणि फक्त तिच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता येत आहे. “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते” असं म्हणणाऱ्या सासूचा व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.
सासूच्या त्यागाचा, विश्वासाचाही मोठा विजय
मेहनत कधीच वाया जात नाही, याची प्रचिती नुकतीच आली. या सुनेने पोलीस भरतीची फिजिकल टेस्ट यशस्वीपणे पार केली आहे. ज्यावेळी ती मैदानावर धावत होती, त्यावेळी तिची सासू घरात देवापुढे तिची स्वप्नं पूर्ण व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती. चाचणीत पास झाल्याची बातमी जेव्हा घरी आली, तेव्हा सासू-सुनेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हा विजय केवळ सुनेचा नव्हता, तर त्या सासूच्या त्यागाचा आणि विश्वासाचाही मोठा विजय होता.
स्त्री सशक्तीकरणाचा नवा आदर्श
आजच्या काळात स्त्री सशक्तीकरणावर अनेक भाषणं दिली जातात, पण या सासूने आपल्या कृतीतून एक आदर्श घालून दिला आहे. "तू तुझं स्वप्न पूर्ण कर, बाकी मी सांभाळून घेईन" हा विश्वास जेव्हा घरच्यांकडून मिळतो, तेव्हा कोणतीही महिला अशक्य गोष्टही शक्य करून दाखवते. बिहारच्या या सासू-सुनेच्या जोडीने दाखवून दिलंय की, एकमेकींच्या विरोधात उभं राहण्यापेक्षा जर एकमेकींचा आधार बनलो, तर यशाचं शिखरं सहज सर करता येतं.
Web Summary : In Bihar, a mother-in-law's support is helping her daughter-in-law achieve her dream of becoming a police officer. The selfless mother manages all household chores, allowing her daughter-in-law to focus on rigorous training. This heartwarming story showcases family support and female empowerment, inspiring many.
Web Summary : बिहार में, एक सास अपनी बहू को पुलिस अधिकारी बनने का सपना पूरा करने में मदद कर रही है। निस्वार्थ भाव से सास घर के सारे काम संभालती है, जिससे बहू कठोर प्रशिक्षण पर ध्यान केंद्रित कर पाती है। यह कहानी पारिवारिक समर्थन और महिला सशक्तिकरण को दर्शाती है, जो कई लोगों को प्रेरित करती है।