DC vs KKR, IPL 2026 Match: दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या इंडियन प्रिमियर लीगच्या ५१ व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्स संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. दिल्लीने दिलेले १४३ धावांचे आव्हान कोलकाताने अगदी सहजपणे १४.२ षटकातच पूर्ण केले. सलामीवीर फिन एलनने ४७ चेंडूत नाबाद १०० धावा काढत कोलकाताचा विजय सोपा केला. दिल्ली कॅपिटल्स संघाला त्यांच्याच मैदानात मात देऊन कोलकाताने आपले आव्हान कायम ठेवले आहे. आयपीएलमध्ये कोलकाताचा हा सलग चौथा विजय आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटकांत १४२ धावांवर रोखण्यात कोलकाता संघाला यश आले. यानंतर सलामीला अजिंक्य रहाणे आणि फिन एलन यांनी कोलकाताच्या डावाची सुरुवात केली. परंतु, कोलकाता संघाची धावसंख्या २९ असतानाच अजिंक्य रहाणे धावचीत झाला. कर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेने १३ धावा केल्या. अजिंक्य राहणेला या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. त्यानंतर आलेल्या रघुवंशीला अक्षर पटेलने त्रिफळाचीत करून माघारी धाडले. संघ अडचणीत असतानाच कॅमेरून ग्रीन आणि फिन एलन यांनी सावध खेळी करत कोलकाताला विजयापर्यंत नेले.
१० षटकार, ५ चौकारांसह फिन एलनची दमदार खेळी
कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या फिन एलनने दमदार कामगिरी केली. ४७ चेंडूत १० षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने एलनने नाबाद १०० धावा केल्या. एकीकडे फिन एलन दिल्लीच्या गोलंदाजांना चोपत असताना दुसरीकडे कॅमेरून ग्रीनने संयमित खेळी करत चांगली साथ दिली. ग्रीनने २७ चेंडूत ३३ धावा केल्या. यामध्ये २ षटकारांचा समावेश आहे. दिल्ली कॅपिटल संघाकडून केवळ अक्षर पटेल याने एक गडी बाद केला. दमदार खेळी करून संघाला विजयापर्यंत नेणारा फिन एलन सामनावीराचा मानकरी ठरला.
तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मोठी मजल मारता आली नाही. निर्धारित २० षटकांत दिल्लीचा संघ १४२ धावाच करू शकला. सलामीवीर पथुम निसांकाने २९ चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीत ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. यानंतर के. एल. राहुल (२३) आणि आशुतोष शर्मा (३९) या दोघांचा अपवाद वगळता दिल्ली संघातील अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कोलकाताच्या अनुकूल रॉय आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर वैभव अरोरा, सुनील नरेन आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
Web Summary : Kolkata Knight Riders defeated Delhi Capitals by 8 wickets in IPL 2026. Finn Allen's unbeaten century (100 off 47) powered KKR to victory, chasing down the 143-run target with ease. KKR secured their fourth consecutive win.
Web Summary : कोलकाता नाइट राइडर्स ने आईपीएल 2026 में दिल्ली कैपिटल्स को 8 विकेट से हराया। फिन एलन के नाबाद शतक (47 गेंदों में 100 रन) ने केकेआर को आसानी से 143 रनों का लक्ष्य हासिल करने में मदद की। केकेआर ने लगातार चौथी जीत हासिल की।