शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 22:21 IST

CM Devendra Fadnavis Reaction On Nida Khan Arrested: नाशिक TCS प्रकरणात निदा खानला लपण्यासाठी AIMIM नगरसेवकांनी मदत केल्याचे समोर येत असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

CM Devendra Fadnavis Reaction On Nida Khan Arrested: नाशिक टीसीएस प्रकरणात आता नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. निदा खानला लपून राहण्यासाठी AIMIM पक्षाच्या नगरसेवकाने मदत केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. या प्रकरणात कोण मदत करत आहे, कोणाचे आशीर्वाद आहेत, हे सगळे शोधून काढले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हे स्पष्टपणे दिसत आहे की, निदा खानला लपवून ठेवण्यात एमआयएमच्या नगरसेवकांचा हात होता. या सगळ्याच्या पाठीमागे कोण होते, हेदेखील शोधून काढले जाईल. अशा प्रकारे धर्मांतरणाच्या रॅकेटमध्ये ते सामील आहेत का, हे जे रॅकेट आहे, ते त्याला मदत करत आहेत का, त्यांचा याला आशीर्वाद आहे का, हे सगळे शोधले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निदा खान छत्रपती संभाजीनगर येथे लपून बसली होती

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील अत्याचार व कथित सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात (कार्पोरेट लव्ह जिहाद) छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने मोठी कारवाई केली. या प्रकरणातील फरार महिला आरोपी निदा खानला नारेगावातून अटक करण्यात आली. निदा खान पोलिसांना गुंगारा देत छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात लपून बसली होती. निदा खान हिला लपण्यासाठी मदत करत असल्याच्या आरोपाखाली छत्रपती संभाजीनगरचे AIMIM पक्षाचे नगरसेवक मतिन पटेल याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, ज्या ठिकाणावरून निदा खानला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्या परिसरात अनेक अवैध धंदे सुरू आहेत.  भागातील एमआयएमच्या मतीन नावाच्या नगरसेवकालाही अटक करावी. छत्रपती संभाजीनगर नावाचा इम्तियाज जलील यांना पहिल्यापासून राग आहे. त्या मुलीला लपवण्यामागे मतीन पटेल आणि त्यांचे बॉस इम्तियाज जलील यांचा हात आहे, असा गंभीर आरोप करत, एमआयएमवर बंदी घालण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : AIMIM corporator involved in hiding Nida Khan: CM Fadnavis states.

Web Summary : CM Fadnavis alleges AIMIM corporator helped hide Nida Khan, accused in forced conversion case. He vows investigation into potential conversion racket involvement.
टॅग्स :TCS Nashik CaseTCS नाशिक केसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन