शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

खडसेंना राष्ट्रवादीत मिळणार मोठी जबाबदारी?; दस्तुरखुद्द खडसेंनीच दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 11:26 AM

Eknath Khadse NCP: राष्ट्रवादी कार्यालयात एकनाथ खडसेंचा स्वागत सोहळा

जळगाव:  माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दसऱ्याला प्रथमच राष्ट्रवादी कार्यालयात भेट दिली. वाईट प्रवृत्तींशी लढण्याचा हा दिवस असून अपल्यालाही समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात लढायचे असल्याचे खडसे यावेळी म्हणाले. अद्याप मोठे स्वागत बाकी आल्याचे सांगत एकप्रकारे मोठे पद मिळण्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत. 

राष्ट्रवादीच्या कार्यालयात खडसे दाखल होताच फटाके फोडून फुलांची उधळण करण्यात आली. महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. काही वेळ गोंधळाचे वातावरण झाले होते. आज पहिलाच दिवस असल्याने आपण जास्त काही बोलणार नाही असे खडसे यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले. सर्वांनी मिळून संघटना वाढविली तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या स्वागत सोहळ्याला माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्षय अभिषेक पाटील, ज्ञानेश्वर महाजन, ऍड कुणाल पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षय कल्पना पाटील, जयश्री पाटील, ममता तडवी आदींसह  पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित  होते.  

जगवानी पुस्तकातून करणार गौप्यस्फोटमाजी आमदार गुरुमुख जगवानी यानीही एकनाथ खडसे यांच्या सोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आपल्यावर जिल्ह्यात काय काय आणि कोनी कोणी अन्याय केला हे उतरण या आपल्या पुस्तकातून आपण मांडले असून लवकरच हे पुस्तक प्रकाशित होणार असल्याची माहिती जगवानी यांनी माध्यमांना दिली. जिथे एकनाथ खडसे तिथे आपण, असे संगत आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्यावर जिल्ह्ययात अन्यान झाला आहे मात्र आपण कोणाचेही नाव घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 2016 मध्ये मला बिनविरोध निवडून आणण्यासाठी खडसेंनी एवढे कष्ट सोसले असताना आता त्यांच्या कठीण काळात मी त्यांना एकटे कसे सोडणार, असेही ते म्हणाले.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस