शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
4
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
5
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
6
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
7
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
8
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
9
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
10
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
11
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
12
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
13
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
14
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
15
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
16
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
17
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
18
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
19
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
20
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha: देवेंद्र फडणवीस फॉर्मात! महाविकास आघाडीच्या आणखी एका मंत्र्याला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 14:46 IST

Devendra Fadnavis to bring breach of privilege motion against ashok chavan: देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमक पवित्रा; आघाडी सरकारचा आणखी एक मंत्री अडचणीत

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session 2021) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आक्रमक पवित्रा घेत घेतला आहे. संजय राठोड, मनसुख हिरेन प्रकरणात फडणवीसांनी सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही. सरकारच्या मंत्र्यांनादेखील फडणवीस अडचणीत आणत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ अशोक सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात देवेंद्र फडणवीसांकडून हक्कभंग दाखल

'मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयात सभागृहात अशोक चव्हाण यांनी आज खोटं निवेदन केलं. १०२ ची घटनादुरूस्ती मराठा आरक्षण कायद्याला लागू होत नाही. ऍटर्नी जनरलसंदर्भात त्यांनी चुकीचं विधान केलं आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार आहे', असं फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं. 'मुकुल रोहतगींनी सांगितल्यानुसार त्यांना ऍटर्नी जनरलनी पाठिंबा दिला. पण चव्हाणांनी ऍटर्नी जनरलच्या विरोधात चुकीची माहिती दिली,' असा दावा त्यांनी केला.

सचिन वाझेंवरुन राजकारण तापलं; गृहमंत्र्यांचा शरद पवारांना कॉल, दिला महत्त्वाचा सल्ला

अनिल देशमुखांविरोधातही हक्कभंग प्रस्ताव
देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातदेखील हक्कभंग प्रस्ताव मांडला. अनिल देशमुख यांनी काल अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण (Anvay Naik Death Case) दाबल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता. त्या प्रकरणी फडणवीस यांनी देशमुख यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ
देशमुख यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला. 'अन्वय नाईक यांची हत्या झाली नसून आत्महत्या आहे. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी निकाल देताना आत्महत्येस प्रवृत्त केलं नसल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबलं असं म्हणणं चुकीचं आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सभागृहातदेखील सांगितला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असतानाही अशा प्रकारचं विधान देशमुख यांनी केलं. हे विधान न्यायालयाचा अवमान करणारं असल्याचं फडणवीस म्हणाले. 
 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnvay Naikअन्वय नाईकAnil Deshmukhअनिल देशमुखAshok Chavanअशोक चव्हाण