Mansukh Hiren death case : सचिन वाझेंवरुन राजकारण तापलं; गृहमंत्र्यांचा शरद पवारांना कॉल, दिला महत्त्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 12:16 PM2021-03-10T12:16:01+5:302021-03-10T12:23:35+5:30

Sharad Pawar : शरद पवार यांनी अजित पवार आणि अनिल देशमुख यांना महत्त्वाचा सल्ला दिल्याचे समजते.

Sharad Pawar discussion with Ajit Pawar and Anil Deshmukh over Mansukh Hiren death case | Mansukh Hiren death case : सचिन वाझेंवरुन राजकारण तापलं; गृहमंत्र्यांचा शरद पवारांना कॉल, दिला महत्त्वाचा सल्ला

Mansukh Hiren death case : सचिन वाझेंवरुन राजकारण तापलं; गृहमंत्र्यांचा शरद पवारांना कॉल, दिला महत्त्वाचा सल्ला

Next

मुंबई :  हिरेन मनसुख मृत्यू प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा दाखल देत सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केल्याचे म्हटले. त्यामुळे सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही विरोधकांनी लावून धरली. तसेच, याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सादर केलेल्या पुराव्यामुळे महाविकास आघाडी सरकारची नाचक्की झाल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चौकशी केली असून महाविकास आघाडी सरकारला योग्य सल्ला दिल्याचे सांगण्यात येते.  (Sharad Pawar discussion with Ajit Pawar and Anil Deshmukh over Mansukh Hiren death case)

सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही भाजपाने लावून धरली. त्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळानंतर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याचे समजते. तसेच, या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी अजित पवार आणि अनिल देशमुख यांना महत्त्वाचा सल्ला दिल्याचे समजते. यासंदर्भातील वृत्त टीव्ही-९ ने दिले आहे.

दरम्यान, आज सभागृहात सत्ताधाऱ्यांची रणनीती नेमकी काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यातच सचिन वाझेंची बदली करणार करण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले."वाझे असो वा कुणीही, शासन कुणाला पाठीशी घालणार नाही. विरोधकांनी त्यांच्याकडील पुरावे एटीएसला द्यावेत, तसेच सचिन वाझे यांची बदली करण्यात येत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी विधानपरिषदेत सांगितले आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी आज सभागृहात बजेट मंजूर करून घेणे, हाच एकमेव अजेंडा ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे.

(Mansukh Hiren Case: अखेर सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचमधून उचलबांगडी होणार; गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा)

वाझे यांना अद्याप अटक का नाही? - देवेंद्र फडणवीस
मंगळवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. वाझे यांना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. "हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या दाव्यानुसार एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केला असून, या प्रकरणी वाझे यांना अटक करा," अशी मागणी फडणवीस यांनी केली. यावेळी फडणवीस यांनी त्यांची तक्रारही वाचून दाखवली.

Web Title: Sharad Pawar discussion with Ajit Pawar and Anil Deshmukh over Mansukh Hiren death case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.