शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कोरोना, टक्केवारीपासून पूजा चव्हाणपर्यंत; विधानसभेत नीतेश राणेंकडून ठाकरे सरकारवर घणाघात, केले गंभीर आरोप

By बाळकृष्ण परब | Published: March 06, 2021 10:57 AM

Nitesh Rane lashes out at Thackeray government in Assembly : राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीदरम्यान झालेला भ्रष्टाचार, राज्यातील कायदा सुव्यवस्था, टक्केवारीचे गणित यापासून ते सध्या गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत विविध विषयांवरून नितेश राणे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली

मुंबई - विधानसभेमध्ये काल विरोधी पक्षाने आणलेल्या २९३ प्रस्तावावर बोलताना भाजपा आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीदरम्यान झालेला भ्रष्टाचार, राज्यातील कायदा सुव्यवस्था, टक्केवारीचे गणित यापासून ते सध्या गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणापर्यंत विविध विषयांवरून नितेश राणे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. (Corona, Percentage to Pooja Chavan; Nitesh Rane lashes out at Thackeray government in Assembly)

यावेळी सभागृहात नीतेश राणे म्हणाले की, अर्थसंकल्पातून जास्त अपेक्षा ठेवू नये, असं सरकार सांगतंय. राज्यासमोर आर्थिक संकट आहे असं सरकार सांगतंय. पण हे आर्थिक संकट केवळ शेतकरी आणि कामगारांसांठीच आहे का. पण सरकारमध्ये बसलेले लोक राजरोसपणे लूट करताहेत. भ्रष्टाचार करताहेत. त्याबाबतही विचार झाला पाहिजे. कारण हे आर्थिक संकट केवळ सामान्य लोकांसाठी आहे. सरकारकडून राजरोसपणे भ्रष्टाचार सुरू आहे. त्याबाबत कुणी बोलत नाही. सरदेसाईंसारख्या व्यक्तींना सरकार का पाठिंबा देतंय. त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत राजरोजपणे का फिरतात. ते कंत्राटदारांना फोन का करतात. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा का दिली जातेय. 

बीकेसीमधील वैभव चेंबर्स नावाच्या इमारतीत अधिकारी का जातात. जम्बो कोविड सेंटरबाबत उल्लेख केला जातोय. याबाबत अमित साटम यांनी पुस्तिकाच प्रकाशित केलीय. जम्बो कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. मुंबईमध्ये नाईट लाइफ नावाची गँग कार्यरत आहे. डिनो मोरिया सरकारचा जावई आहे का? मनपा आणि सरकारमधील कुठलंही काम असल्यास करुन देतो म्हणून सांगतो, त्याला अधिकार कुणी दिलेत असा सवाल नीतेश राणेंनी केला. 

राज्यातील सरकारचे ५ आणि ८ हे आवडते आकडे आहेत. पाच आणि आठच्या पुढे जात नाहीत. जोपर्यंत हे आकडे येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही, असं ठरलंय. आता हे पाच दिवस आहेत. पाच तास आहेत की पाच टक्के आहेत. ते आता तुम्हीच ठरवा, पण हे आपल्या राज्यात चाललंय, असा आरोपही नितेश राणेंनी केला. 

यावेळी राज्याला एक परिवहन मंत्री द्या, अशी मागणी करत नितेश राणेंनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. अध्यक्ष महोदय, राज्याला एक परिवहनमंत्री द्या, राज्याला परिवहन मंत्री नाही. आहेत ते परिवार मंत्री बनले आहेत. ते कलानगरच्या अवतीभवती घुटमळत असतात. कलानगरच्या बाहेर पडावे, मंत्रालय आहे, एसटी कामगार आहेत, त्यांचा पगार आहे, त्यात लक्ष घाला, असा सल्ला राणेंनी दिला. 

आमच्या आमदारांना धमकीचे फोन येतात. त्याची चौकशी होत नाही. चित्रा वाघ यांच्या वाहनामागे एक वाहन पाळतीवर असते. आता कुणी धमक्या दिल्यानंतर कारवाई होत नसेल. तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था हाती घेतली तर आमच्यावर केस करायच्या नाहीत. काही बोललं की जुन्या केस उकरून काढल्या जाता. अशी केस आहे तशी केस आहे सांगितलं जातं. पण जूनं बोलायचं तर आमच्याकडे खूप आहे. तुमच्यासोबत ३९ वर्षे काढली आहेत. पण आम्हालाही बाळासाहेबांची शिकवण माहिती आहे, अंगावर आले तर शिंगावर घ्या. त्यामुळे जुन्या गोष्टींची आठव थांबावायचा प्रयत्न केला तर मग सोनू निगम पण निघेल आणि आणखी काही निघेल, हे लक्षात ठेवा, असा सूचक इशाराही नीतेश राणेंनी दिला.  कायदा दुसऱ्यांना लागू आहे तोच अन्य लोकांना लागला पाहिजे. पूजा चव्हाण काय प्रकरण आहे. ११ की १२ ऑडिओ क्लिप आहेत. त्यातून बरेच काही स्पष्ट होते. तरी १०-१२ दिवस लागतात बाहेर पडण्यासाठी एवढे दिवस का लागतात, शक्तिप्रदर्शन करण्यासाठी का. ते शक्तिप्रदर्शन कुणाला घाबरवण्यासाठी होतं. राज्यातील जनतेला की महिलांना घाबरवण्यासाठी. बघा आमच्याविरोधात काही बोलाल तर आमच्याकडे किती ताकद आहे ती.  गुन्हेगारांची हिंमत का वाढतेच याचा विचार व्हायला हवा. गेल्या दीड वर्षांत एक कवच तयार झालंय. मंत्री अडचणीत सापडला की यंत्रणा कामाला लागते, अशी टीका नीतेश राणेंनी केली. 

एखादं प्रकरण पद्धतशीरपणे कसं लपवायचं याचा ट्रेनिंग कॅम्प हे  सुरू करतील. म्हणजे उद्या काही त्रास नाही. गायकवाड ताईंना सांगितलं पाहिजे याचीही एक शाळा सुरू करा, असा टोलाही नीतेश राणे यांनी लगावला. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा