Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोरोनाची लागण; शरद पवारांनी घेतली विशेष खबरदारी

By प्रविण मरगळे | Published: February 22, 2021 10:50 AM2021-02-22T10:50:52+5:302021-02-22T10:58:31+5:30

Sharad Pawar Take Precaution due to NCP Minister Affected from Corona: रविवारीच मंत्री छगन भुजबळ यांनी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नसमारंभात उपस्थिती लावली होती, या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित होते.

Corona infection in NCP ministers; Sharad Pawar Cancelled all Public gathering programme | Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोरोनाची लागण; शरद पवारांनी घेतली विशेष खबरदारी

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोरोनाची लागण; शरद पवारांनी घेतली विशेष खबरदारी

Next
ठळक मुद्देजयंत पाटील, राजेश टोपे, एकनाथ खडसेंपाठोपाठ छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून जयंत पाटील यांचा सुरू होता महाराष्ट्र दौरा रविवारी एका विवाह सोहळ्यात छगन भुजबळ, शरद पवार एकत्रितपणे होते उपस्थित

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ठाकरे सरकार पुन्हा अलर्टवर आलं आहे, दिवसाला ५ हजाराहून अधिक कोरोना रूग्ण आढळल्याने आता पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता, यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनी पुढील ८ दिवस महत्त्वाचे असून जर नागरिकांनी शिस्त पाळली नाही, मास्क घातला नाही तर लॉकडाऊन निश्चितच होणार असा इशारा दिला आहे.(NCP Sharad Pawar Cancelled all public gathering programme till 1st March)  

यातच राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील(NCP Jayant Patil), आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope), नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांच्यापाठोपाठ आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे, हे सर्व नेते एकमेकांच्या संपर्कात आले होते, रविवारीच मंत्री छगन भुजबळ यांनी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नसमारंभात उपस्थिती लावली होती, या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) हेदेखील हजर होते, त्यामुळे शरद पवारांनी खबरदारी म्हणून १ मार्च पर्यंत त्यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे. 

राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगीनाही

मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात गर्दी वाढत असून  राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसेच नियम न पाळणारेही मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन

यवतमाळ, अमरावती अशा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित आढळत आहेत. अशा ठिकाणी स्थानिक प्रशासनाने काही अवधी देऊन लॉकडाऊन लागू करावा. अचानक लॉकडाऊन लावणे किंवा अचानक सर्व सुरू करण्याचा प्रकार टाळण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिली.

तेव्हाच सर्वसामान्यांसाठी लसीकरण

राज्यात ९ लाख जणांचे लसीकरण झाले आहे. बाकी सर्वसामान्यांचा लसीकरणाचा विषय 'उपरवाले के' म्हणजेच केंद्राच्या हातात आहे. पण, येत्या काही काळात आणखी ३-४ लसी उपलब्ध होतील. त्या आल्या की सर्वसामान्य नागरिकांसाठी लसीकरण केले जाईल, असेही ते म्हणाले.

मास्क हीच ढाल

कोरोनाच्या आजारावर सध्यातरी कोणतेही औषध निघालेले नाही. त्यामुळे या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे. कोरोनाच्या संपर्काची साखळी तोडणे, इतकेच आपल्या हाती आहे. हाँल, रेस्टाॅरंट आदी ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर मालकांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. 

होय, मीच जबाबदार!

माझे कुटुंब - माझी जबाबदारी या मोहिमेनंतर आता होय, मीच जबाबदार, या मोहिमेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मास्क घाला, सुरक्षित अंतर राखा, नियम पाळा आणि कोरोना टाळा. अन्यथा पुढील आठ दिवसांत आढवा घेऊन लॉकडाऊन लावावा लागेल. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

 

Web Title: Corona infection in NCP ministers; Sharad Pawar Cancelled all Public gathering programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.