शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
3
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
7
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
8
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
9
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
11
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
12
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
13
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
14
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
15
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
17
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
18
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
20
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोलेंचा शिवसेना-राष्ट्रवादीला परखड इशारा; “काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे....”

By प्रविण मरगळे | Updated: February 25, 2021 18:24 IST

Congress Nana Patole Warns NCP ShivSena: काही महिन्यांपूर्वी मंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) आणि अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनीही याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची(CM Uddhav Thackeray) भेट घेतली होती

ठळक मुद्देएखादी गोष्ट कमी मिळत असेल तर ती बोलल्यास चूक म्हणता येणार नाहीमहाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर आहे, समान वाटप व्हावं इतकीच आमची अपेक्षाविधानसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध नेमण्याची राज्याची परंपरा आहे

मुंबई – महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress Nana Patole) यांनी ठाकरे सरकारला थेट इशारा दिला आहे. काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे हे लक्षात ठेवा अशा शब्दात नाना पटोलेंनी परखड भूमिका मांडली आहे. काँग्रेस आमदारांना निधी कमी मिळत असल्याच्या तक्रारीवरून नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली.(Congress State President Nana Patole Warns NCP-Shivsena over Congress MLA complain of lack of funds)

काही महिन्यांपूर्वी मंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) आणि अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनीही याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची(CM Uddhav Thackeray) भेट घेतली होती, या भेटीनंतर या समस्येवर तोडगा निघेल अशी शक्यता होती, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे काँग्रेस आमदारांना निधी कमी देत असल्याची खंत पक्षातून व्यक्त होत आहे. यातच काँग्रेसला बेदखल करू नका असा इशाराच नाना पटोलेंनी शिवसेना(Shivsena)-राष्ट्रवादी(NCP) काँग्रेसला दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं पुन्हा उघड झालं आहे.

याबाबत नाना पटोले म्हणाले की, एखादी गोष्ट कमी मिळत असेल तर ती बोलल्यास चूक म्हणता येणार नाही, महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर आहे, समान वाटप व्हावं इतकीच आमची अपेक्षा आहे, काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे लक्षात असू द्या असा अप्रत्यक्षपणे इशाराच त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला कठोर शब्दात दिला.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसचेच

त्याचसोबत नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्त आहे, यापदावर राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी दावा केला, परंतु विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील असं वारंवार सांगितलं जात आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध नेमण्याची राज्याची परंपरा आहे, ती सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून कायम ठेवावी, या संविधानिक पदाची निवड करताना कोणताही वाद होऊ नये ही आमची भूमिका असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितले.

देशभरातील टोल बंद करावेत

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना देशात मात्र दररोज इंधनाचे दर वाढवून जनतेची लूट सुरु आहे. एकीकडे केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलवर अवाजवी अबकारी कर लावून जनतेला लूटत आहे. त्यातच रस्ते विकास सेसच्या नावाखाली १८ रुपये आणि कृषी सेसच्या नावाखाली ४ रुपये असे तब्बल २२ रुपये प्रति लिटर सेस पेट्रोल, डिझेलवर आकारून दोन्ही हाताने जनतेची लूट सुरु केली आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या माध्यमातूनही लूट सुरु आहे. केंद्रातील मोदी सरकारने एक तर रस्ते विकास सेस बंद करावा किंवा देशभरातील टोल बंद करावेत अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोले