भाजपचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक अध्यक्ष बांगलादेशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 01:31 AM2021-03-05T01:31:07+5:302021-03-05T01:31:19+5:30

मंत्री अस्लम शेख आणि भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी

BJP's North Mumbai minority president is Bangladeshi | भाजपचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक अध्यक्ष बांगलादेशी

भाजपचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक अध्यक्ष बांगलादेशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पुरवणी मागण्यांच्या सत्रामध्ये राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख आणि भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.  


काही दिवसांपूर्वी मालवणीत राम मंदिर बांधणीसाठी देणगी देण्याचे आवाहन करणारे बॅनर्स पोलिसांनी फाडल्याचा व याबद्दल जाब विचारायला गेलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात खोटे गुन्हे नोंदविल्याचा आरोप करणाऱ्या मंगल प्रभात लोढा यांना प्रत्युत्तर देताना अस्लम शेख म्हणाले, ज्या मुंबई पोलिसांची तुलना लंडनच्या ‘स्काॅटलंड यार्ड’शी केली जाते, त्यांच्यावर केवळ  स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी खोटे आरोप करणे योग्य नाही. 
शेख यांनी लोढांच्या मालवणीमधील  हिंदू पलायनाच्या मुद्द्याचा खरपूस समाचार घेताना ज्या मतदारसंघामध्ये ३ लाख मतदारांपैकी २ लाख ३० हजारपेक्षा जास्त मतदार हिंदू आहेत, तिथे हिंदू अल्पसंख्याक कसे काय असू शकतात, असा सवालही अस्लम शेख यांनी 
विचारला.


लोढा यांनी बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा काढताच अस्लम शेख यांनी  भाजप उत्तर मुंबई अल्पसंख्याक युवक अध्यक्ष हा बांगलादेशी घुसखोर असल्याचा आरोप केला. यावर हे सत्य असेल तर मी राजीनामा देईन, असं म्हणत हे जर खोटं असेल तर अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा, असं आव्हान लोढांनी शेख यांना दिलं.
काही दिवसांपूर्वी रुबेल शेख नावाच्या बांगलादेशी घुसखोरास पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी अटक केली होती. चौकशीअंती हा युवक भाजप उत्तर मुंबई अल्पसंख्याक 
युवक अध्यक्ष असल्याचं स्पष्ट झालं होतं. शेख यांना विधानसभेत आव्हान देणारे लोढा आता आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार का? 
हे पाहणं औत्सुक्याचं  ठरणार आहे.

Web Title: BJP's North Mumbai minority president is Bangladeshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा