शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

"हरिश्चंद्रानं उद्धव ठाकरेंच्या रूपात पुनर्जन्म घेतला, हे सत्यवादी सत्ता आणि टक्केवारीसाठी घसरतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 14:54 IST

भाजप नेत्यान लगावला जोरदार टोला

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय आहेत, मिस्टर सत्यवादी, राऊतांचं वक्तव्यसंजय राठोड प्रकरणात न्याय करणारच राऊत यांचा विश्वास

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजपाला शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय आहेत, मिस्टर सत्यवादी आहेत, ते संजय राठोड प्रकरणात न्याय करणारच, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. राऊत यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावला आहे. "हरिश्चंद्राने उद्धव ठाकरेंच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे. हे मिस्टर सत्यवादी फक्त सत्ता आणि टक्केवारी साठी घसरतात. गब्रूच्या बाबतीत प्रश्न सत्तेचा आहे एवढीच अडचण आहे," असं म्हणत भातखळकर यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांच्याबाबतही भाष्य केलं. "चित्रा वाघ 'गब्रू प्रकरणी' रोज सरकारची लाज काढतायत, त्यामुळे कागदी वाघानं त्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ट लावलं. कमाल आहे ठाकरे सरकारची, बलात्काऱ्यावर कारवाई करण्याची धमक नाही. आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करतायत. काय लायकीची माणसं आहे ही? म्हणे हे विचारी आणि सुसंस्कृत," असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. काय म्हणाले होते राऊत?यावेळी भाजपाच्या महिला आघाडीकडून पूजा चव्हाण प्रकरणात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, "पंतप्रधानांनी सांगितलं की आंदोलन करायचं नाही. मात्र महाराष्ट्रापर्यंत हा संदेश पोहोचलेला दिसत नाही. विरोधी पक्षाला आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहेत. पण प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत." "भाजपावाले ज्या विषयासंदर्भात ते आंदोलन करू इच्छितात त्या विषयात मला खात्री आहे की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय आहेत, मिस्टर सत्यवादी आहेत. ते या प्रकरणात नक्कीच न्याय करतील," असा विश्वास आहे, असं राऊत म्हणाले.

 

 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतTwitterट्विटरBJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकर