शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी नातवाचे कान टोचले; अजित पवारांनी ‘सिल्व्हर ओक’ गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 06:42 IST

बैठक पूर्वनियोजित; जयंत पाटील यांनी केली सारवासारव

मुंबई : माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही, तो अपरिपक्व आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांचे कान टोचताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवारांचे निवासस्थान असलेले ‘सिल्व्हर ओक’ गाठल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी अलिकडच्या काळात पक्षाशी विसंगत भूमिका घेतली आहे. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती, तर ‘जय श्रीराम’ म्हणत राम मंदिराच्या समर्थनार्थ त्यांनी नुकतेच खुले पत्र लिहिले आहे. पार्थ यांच्या या भूमिकेबद्दल पत्रकारांनी विचारले असता ‘पार्थ अपरिपक्वआहे. त्याचा अनुभव तोकडा आहे. त्याच्या बोलण्याला मी काडीची किमंत देत नाही’ अशा शब्दांत खा. पवार यांनी फटकारले.शरद पवार यांचे हे वक्तव्य वृत्त वाहिन्यांवर झळकताच मंत्रिमंडळाची बैठक सोडून अजित पवार यांनी थेट शरद पवारांचे निवासस्थान गाठले. त्यानंतर राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही तेथे पोहोचले. त्यामुळे चर्चा सुरू झाली. मात्र, ही बैठक पूर्वनियोजित होती, असे सांगत पवार कुटुंबीयात कसलाही वाद नसल्याचा खुलासा जंयत पाटील यांनी केला. पाटील म्हणाले, पार्थ पवारांबाबत कसलीही चर्चा झाली नाही. पार्थने काही मते मांडली असतील तर ती मतं मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. अजितदादांनी मंत्रिमंडळ बैठक अर्ध्यावर सोडली नाही. मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन ते बाहेर पडले. सुशांतप्रकरणी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे, त्यामुळे त्यावर पुन्हा वेगळे काही सांगण्याची गरज नाही, असे सांगत पाटील यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारले असता, हा पवार कुटुंबातील वाद आहे, त्यावर आपण बोलणे योग्य नसल्याचे सांगत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिक भाष्य करणे टाळले.अजित पवारांचे सूचक मौनपार्थने केलेली सीबीआय चौकशीची मागणी आणि त्यानंतर राम मंदिराच्या समर्थनार्थ लिहिलेल्या पत्रावर आजोबांनी पार्थची कान टोचले, मात्र वडील अजित पवार यांनी कोणतेही भाष्य केले नाही. अजितदादांचे हे मौन सूचक असल्याचे अर्थ काढले जात आहे.मुंबई पोलिसांवर विश्वास; पण सीबीआयला हरकत नाही : पवारसुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयला करायचा असेल तर आपली त्याला हरकत नाही. मात्र मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आपला पूर्ण विश्वास आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. सुशांत चांगला अभिनेता होता. त्याची आत्महत्या वेदनादायी आहे, पण माझ्या जिल्ह्यात २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, पण त्याची मीडियाने दखल घेतली नाही, असा टोलाही त्यांनी मीडियाला लगावला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारparth pawarपार्थ पवार