पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशावरून काँग्रेस नाराज; थेट राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 08:45 AM2021-04-05T08:45:52+5:302021-04-05T08:48:09+5:30

आता काँग्रेस नेते जर्नादन चांदूरकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर यांना टार्गेट केले आहे.

Aditya Thakare sanctioning DPDC funds to 43 Shivsena Corportors Says Congress Janardan Chandurkar | पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशावरून काँग्रेस नाराज; थेट राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी

पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशावरून काँग्रेस नाराज; थेट राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी

Next
ठळक मुद्दे४३ शिवसेनेच्या नगरसेवकांसाठी ३ हजार ६९३ कोटी रुपये ब्युटीफिकेशनसाठी डीपीडीसीच्या फंडातून काम करण्यासाठी दिले आहेतआर्थिक शिस्तीनुसार DPDC फंडासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी लागते, अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांनी ही तरतूद केली आहेअजित पवारांना याची कल्पना असेल तर ठीक अन्यथा अर्थ विभागालाही हे आव्हान आहे

मुंबई – राज्यात काँग्रेस आणि शिवसेना हातात हात घालून सरकार चालवत आहे, परंतु आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढताना दिसत आहे. महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या शिवसेनेवर टीका करण्याची संधी काँग्रेस सोडत नाही, विविध मुद्द्यावरून काँग्रेस नेते शिवसेनेला लक्ष्य करताना दिसत असतात.(Congress Leader Janardan Chadurkar Target Aditya Thacekray) 

आता काँग्रेस नेते जर्नादन चांदूरकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर यांना टार्गेट केले आहे. जर्नादन चांदूरकर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलंय की, राज्याचे पर्यावरण आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी शहरातील ४३ शिवसेनेच्या नगरसेवकांसाठी ३ हजार ६९३ कोटी रुपये ब्युटीफिकेशनसाठी डीपीडीसीच्या फंडातून काम करण्यासाठी दिले आहेत. हा आदेश मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला असून पुढील कार्यवाहीसाठी म्हाडाकडे गेली आहे. मुंबईत पैसे आले त्याचा आनंद आहे, परंतु येणाऱ्या BMC च्या निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेच्या ४३ नगरसेवकांच्या मतदारसंघात ब्युटिफिकेशनचं असं काम DPDC च्या इतिहासात पहिल्यांदाच मंजूर करण्यात आलं आहे. ही बाब घटनाबाह्य आहे असं त्यांनी सांगितलं आहे.

त्याचसोबत या प्रकाराची सर्व राजकीय पक्षांनी तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी दखल घेतली पाहिजे. कारण आर्थिक शिस्तीनुसार DPDC फंडासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी लागते, अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांनी ही तरतूद केली आहे, बजेटमधील फंड वगळून ३ हजार ६९३ कोटीचा निधी मंजूर केला हा कुठून येणार? याची पुरवणी मागणी अजित पवारांना विधानसभेत मांडावा लागेल, अजित पवारांना याची कल्पना असेल तर ठीक अन्यथा अर्थ विभागालाही हे आव्हान आहे. म्हणून सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा हे तत्व शिवसेनेला मान्य नाही, ही घटनाबाह्य बाब असल्याने या प्रकाराकडे लक्ष द्यावं, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे, की बेकायदेशीर आदेश असतील तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे ते मंजूर करू नये असं आवाहनही जर्नादन चांदूरकर यांनी केलं आहे.

भाजपा नेते निलेश राणेंची टीका   

जर्नादन चांदूरकर यांच्या व्हिडीओनंतर भाजपा नेते निलेश राणे यांनीही आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंनी प्रशासनाबद्दल अज्ञान आणि मित्रपक्षाला ठेंगा कसा दाखवला हे जर्नादन चांदूरकर यांनी जनतेसमोर आणले आहे, ज्या मंत्र्याला बजेट कळत नाही तो कॅबिनेट आणि पालकमंत्री आहे अशा शब्दात निलेश राणेंनी टोला लगावला आहे.

Web Title: Aditya Thakare sanctioning DPDC funds to 43 Shivsena Corportors Says Congress Janardan Chandurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.