फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 06:47 IST2026-04-28T06:47:08+5:302026-04-28T06:47:53+5:30

जिया २०१२ पासून मार्कच्या संपर्कात होती. तसेच चार वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती.

Nesco Drugs Case: Jiah joint account with absconding 'Mark'; Police custody extended, Rs 14.95 lakh for drug sale? | फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?

फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?

मुंबई - नेस्को ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेली ११ वी आरोपी तसेच डान्सर जिया रेचल प्रदीप जेकब (३३) हिचे याच प्रकरणातील फरार आरोपी महेश खेमलानी ऊर्फ मार्क याच्यासोबत बँकेत जॉइंट अकाउंट असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच या खात्यात रोख रकमेच्या स्वरूपात जमा केलेले १४ लाख ९५ हजार ४०० रुपये त्यांनी अमली पदार्थ विक्री करून मिळविल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, सोमवारी बोरीवली मॅजिस्ट्रेट कोर्टाने तिच्या पोलिस कोठडीत ३० एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

वनराई पोलिस ठाण्याचे मुख्य तपास अधिकारी निरीक्षक महेश महाले यांनी कोर्टाकडे जियाच्या अतिरिक्त ५ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. जिया २०१२ पासून मार्कच्या संपर्कात होती. तसेच चार वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होती. तिचे खासगी बँकमध्ये असलेले खाते हे ती व खेमलानी हे दोघे वापरत असल्याने तो कुठे आहे, कोणाच्या संपर्कात असतो आणि त्याचे काय-काय व्यवसाय आहेत याबाबत जियाला पूर्ण माहिती असल्याचाही पोलिसांचा दावा आहे.  

दरम्यान, नेस्को प्रकरण ११ एप्रिलला घडल्यानंतर १४ एप्रिलला मार्क पसार झाला. तो परदेशात असल्याचे म्हटले जातेय. त्याचे मित्र आणि नातेवाइकांच्या चौकशीच्या माध्यमातून पोलिस त्याचा ठावठिकाणा शोधत आहेत. 

जियाचे बँक स्कॅनर, मार्कनेच पाठवले!
जियाच्या खात्यावर मार्कच्या सांगण्यानुसार आरोपी आनंद पटेल, विनीत गेरेलानी आणि आयुष साहित्य यांनी ४.३७ लाख रुपये पाठवले. हे पैसे पाठविण्यासाठी जियाच्या बँकेचा स्कॅनर हा मार्क यानेच आरोपींना पाठविल्याचे तपासात समोर आले आहे.

Web Title : फरार मार्क के साथ जिया का संयुक्त खाता; ड्रग मनी का संदेह।

Web Summary : नेस्को ड्रग मामले में गिरफ्तार डांसर जिया का फरार मार्क के साथ संयुक्त खाता था। पुलिस को संदेह है कि जमा किए गए ₹14.95 लाख ड्रग बिक्री से थे। उसकी पुलिस हिरासत 30 अप्रैल तक बढ़ा दी गई। माना जा रहा है कि मार्क विदेश में है।

Web Title : Jia's Joint Account with Fugitive Mark; Drug Money Suspected.

Web Summary : Dancer Jia, arrested in the Nesco drug case, had a joint account with fugitive Mark. Police suspect ₹14.95 lakh deposited was from drug sales. Her police custody extended to April 30th. Mark is believed to be abroad.