'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 08:49 IST2026-04-28T08:49:17+5:302026-04-28T08:49:50+5:30

Uttar Pradesh Crime News: राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना शोषणाच्या सामना करावा लागल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्ह्यातून समोर आला आहे.

'Want a position? Then sleep with me', BJP leader made an offer, woman makes serious allegations | 'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप

'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप

राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना शोषणाच्या सामना करावा लागल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्ह्यातून समोर आला आहे. महोबा जिल्ह्यातील भाजपाच्या माजी जिल्हा मंत्री दीपाली तिवारी यांनी जिल्हाध्यक्ष मोहनलाल कुशवाहा यांच्याविरोधात आघाडी उघडत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दीपाली तिवारी यांनी एसपी कार्यालयात जाऊन त्यांनी एक विनंती पत्र पाठवले आहे. तसेच फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या मनातील व्यथा मांडली आहे.

दीपाली तिवारी यांनी सांगितले की, जिल्हा उपाध्यक्ष बनवण्यासाठी मला दिल्ली-लखनौला सोबत येण्याचा प्रस्ताव देण्यात आला. तसेच मी ही गोष्ट न ऐकल्यास पदावरून हटवण्याची धमकी दिली. यासाठी जिल्हा महामंत्री आणि जिल्हा उपाध्यक्षही माझ्यावर दबाव आणत होते, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

महोबामध्ये भाजपाच्या नव्या जिल्हा कार्यकारिणीची स्थापना झाल्यानंतरच असंतोष उफाळून आला आहे. मात्र दीपाली तिवारी यांनी फेसबूक लाईव्ह करत या असंतोषाला चव्हाट्यावर आणले आहे.  दीपाली यांनी आणखी गंभीर आरोप करताना सांगितले की, भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी केवळ माझ्यासमोर पदासाठी लाजिरवाणी अट ठेवली नाही तर माझ्या पतीला बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्याची धमकीसुद्धा दिली. हे सारं काही सहन करण्याच्या पलिकडे गेलं तेव्हा राजीनामा देऊन जनतेसमोर यावं लागलं, असेही त्यांनी सांगितले.

या आरोपांनंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष मोहनलाल कुशवाहा यांनी आपला बचाव केला आहे. त्यांनी दीपाली तिवारी यांनी केलेले सर्व दावे फेटाळून लावले आहेत. तसेच हे आरोप बिनबुडाचे आणि कपोलकल्पित असल्याचा दावा केला आहे. आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी कटकारस्थान रचून हे आरोप करण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.  

Web Title : भाजपा नेता पर पद के लिए यौन संबंध मांगने का आरोप।

Web Summary : उत्तर प्रदेश में भाजपा की एक पूर्व जिला मंत्री ने जिला अध्यक्ष पर पद के बदले यौन संबंध मांगने और उसके पति को धमकी देने का आरोप लगाया। अध्यक्ष ने आरोपों को निराधार और मानहानिकारक बताते हुए खारिज किया।

Web Title : BJP leader accused of 'sleep with me' offer for post.

Web Summary : A BJP ex-district minister in Uttar Pradesh accused the district president of demanding sexual favors for a position and threatening her husband. The president denies the allegations, calling them baseless and defamatory.