‘प्लॅनेट मराठी’चे संचालक अक्षय बर्दापूरकर न्यायालयात हजर; धनादेश न वटल्याप्रकरणी निगडी पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 19:32 IST2026-02-07T19:31:56+5:302026-02-07T19:32:57+5:30

अक्षय बर्दापूरकरने ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ चित्रपट निर्मात्यांशी करार केला, परंतु चित्रपटाचा मोबदला म्हणून प्लॅनेट मराठी या कंपनीतर्फे निर्मात्यांना दिलेला धनादेश वटला नाही

'Planet Marathi' director Akshay Bardapurkar appears in court; Nigdi police take action in case of non-cashing of cheque | ‘प्लॅनेट मराठी’चे संचालक अक्षय बर्दापूरकर न्यायालयात हजर; धनादेश न वटल्याप्रकरणी निगडी पोलिसांची कारवाई

‘प्लॅनेट मराठी’चे संचालक अक्षय बर्दापूरकर न्यायालयात हजर; धनादेश न वटल्याप्रकरणी निगडी पोलिसांची कारवाई

पिंपरी : प्लॅनेट मराठी या मराठी ओटीटी चॅनेलचे संस्थापक संचालक अक्षय बर्दापूरकर याला धनादेश न वटल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी शुक्रवारी (दि. ७ फेब्रुवारी) न्यायालयात हजर केले. पिंपरी न्यायालयाने याबाबत समन्स काढला होता.

अक्षय बर्दापूरकर हा प्लॅनेट मराठीचा संस्थापक संचालक असून प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे त्यांनी अनेक चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यात प्रामुख्याने ‘गोष्ट एका पैठणीची’, चंद्रमुखी या चित्रपटाचा तसेच ‘रान बाजार’ या वेबसिरीजचा समावेश आहे. नुकतेच प्लॅनेट मराठी या कंपनीने दिवाळ खोरी जाहीर केली असून राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (एनसीएलटी) यांच्यातर्फे यासाठी अवसायकाची नेमणूक करण्यात आली आहे.

पुणे येथील चित्रबोली क्रीएशनतर्फे २०२३ मध्ये ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. २०२३ च्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल तसेच पिंपरी-चिंचवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, मुंबई येथील यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, लातूर येथील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाची निवड करण्यात येऊन हा चित्रपट दाखवण्यात आला होता. सिनेमाप्रेमिनी तसेच समीक्षकांनी या चित्रपटाची तारीफ केली होती. या चित्रपटाला दोन पुरस्कार देऊन या फिल्म फेस्टिवल दरम्यान गौरविण्यात आले होते. नंतर हा चित्रपट अक्षय बर्दापूरकर याने चित्रपट निर्मात्यांशी करार करून प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मतर्फे रिलीज केला होता. परंतु या चित्रपटाचा मोबदला म्हणून प्लॅनेट मराठी या कंपनीतर्फे निर्मात्यांना दिलेला धनादेश वटला नाही. 

धनादेश न वटल्याच्या कारणामुळे चित्रबोली क्रीएशनच्या निर्मात्यांनी कंपनी विरुद्ध पिंपरी-चिंचवड न्यायालयात खटला दाखल केला होता. त्या खटल्यामध्ये प्रतिवादी अक्षय बर्दापूरकर हा गैरहजर राहिल्यामुळे त्याच्याविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र समन्स (नाॅनबेलेबल वाॅरंट) जारी केले होते. त्याअनुषंगाने निगडी पोलिसांनी अक्षय बर्दापूरकर याला शुक्रवारी पिंपरीतील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Web Title : प्लैनेट मराठी के निदेशक अक्षय बर्दापूरकर चेक बाउंस मामले में अदालत में पेश

Web Summary : प्लैनेट मराठी के निदेशक अक्षय बर्दापूरकर चेक बाउंस होने के बाद अदालत में पेश हुए। 'डायरी ऑफ विनायक पंडित' के भुगतान में विफलता के कारण एक फिल्म निर्माण कंपनी ने मुकदमा दायर किया। बाद में उन्हें जमानत मिल गई।

Web Title : Planet Marathi Director Akshay Bardapurkar Appears in Court Over Bounced Check

Web Summary : Akshay Bardapurkar, Planet Marathi's director, appeared in court after a check bounced. A film production company sued when Planet Marathi's payment for 'Diary of Vinayak Pandit' failed. He was later granted bail.