Uddhav Thackeray: "ज्या दिवशी कामाला सुरुवात केली, त्याच दिवशी निरोप घेतोय" उद्धव ठाकरे भावूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 19:19 IST2026-03-24T19:16:41+5:302026-03-24T19:19:57+5:30

Uddhav Thackeray Speech: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ आज संपत असून, सभागृहात आज निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

"I am saying goodbye on the same day I started work" Uddhav Thackeray gets emotional! | Uddhav Thackeray: "ज्या दिवशी कामाला सुरुवात केली, त्याच दिवशी निरोप घेतोय" उद्धव ठाकरे भावूक!

Uddhav Thackeray: "ज्या दिवशी कामाला सुरुवात केली, त्याच दिवशी निरोप घेतोय" उद्धव ठाकरे भावूक!

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ आज संपत असून, सभागृहात आज निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. "ज्या दिवशी खऱ्या अर्थाने माझ्या कामाला सुरुवात झाली होती, त्याच दिवशी मी सभागृहाचा निरोप घेतोय," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी सहा वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, "आज २४ मार्च आहे. सहा वर्षांपूर्वी याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला होता. मुख्यमंत्री म्हणून माझ्या कामाची खरी सुरुवात त्याच दिवसापासून झाली. तो काळ अत्यंत विचित्र आणि आव्हानात्मक होता. आज त्याच तारखेला मी या सभागृहाचा निरोप घेतोय, हा एक विलक्षण योगायोग आहे."

उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या निर्णयांचाही उल्लेख केला. "माझ्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी देण्याचा होता, तर मंत्रिमंडळातील शेवटचा निर्णय औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा होता. अडीच वर्षांच्या या काळात कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करावा लागला," असेही त्यांनी नमूद केले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर आणि कोरोना योद्ध्यांचेही आभार मानले, ज्यांनी संकटकाळात त्यांना साथ दिली.

'या' ९ आमदारांचा कार्यकाळ संपला!

१. उद्धव ठाकरे (शिवसेना - उद्धवसेना)
२. डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना - शिंदेसेना)
३. अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)
४. शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट)
५. राजेश राठोड (काँग्रेस)
६. संदीप जोशी (भाजप)
७. दादाराव केचे (भाजप)
८. रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
९. संजय केनेकर (भाजप)

Web Title : उद्धव ठाकरे भावुक विदाई: कार्यकाल पर चिंतन!

Web Summary : उद्धव ठाकरे ने भावुक विदाई दी, लॉकडाउन के दौरान मुख्यमंत्री कार्यकाल की शुरुआत को याद किया। उन्होंने रायगढ़ किले के संरक्षण और औरंगाबाद के नाम बदलने जैसे प्रमुख निर्णयों पर प्रकाश डाला, चुनौतियों को स्वीकार किया और कोरोना योद्धाओं के प्रति आभार व्यक्त किया।

Web Title : Uddhav Thackeray bids farewell, reflects on his tenure emotionally.

Web Summary : Uddhav Thackeray emotionally bid farewell, recalling his CM tenure started during the lockdown. He highlighted key decisions like Raigad fort conservation and Aurangabad renaming, acknowledging challenges and expressing gratitude to corona warriors.