संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित होणार, विरोधी पक्षांच्या मागणीला सत्ताधाऱ्यांची सहमती, कारण काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 19:37 IST2026-03-24T19:33:16+5:302026-03-24T19:37:45+5:30

Parliament Budget Session: सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा २ एप्रिलपर्यंत नियोजित आहे. मात्र आता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम तारखेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. 

Parliament Budget Session: The budget session of Parliament will be postponed, the ruling party has agreed to the demand of the opposition parties, what is the reason? | संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित होणार, विरोधी पक्षांच्या मागणीला सत्ताधाऱ्यांची सहमती, कारण काय?  

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित होणार, विरोधी पक्षांच्या मागणीला सत्ताधाऱ्यांची सहमती, कारण काय?  

सध्या सुरू असलेल्या संसदेच्याअर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा २ एप्रिलपर्यंत नियोजित आहे. सभागृहात झालेला गोंधळ आणि गदारोळामुळे वाया गेलेल्या कामकाजाच्या वेळेची भरपाई करण्यासाठी या आठवड्यात शनिवारी आणि रविवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज होणार आहे. मात्र आता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम तारखेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यामधील कामकाज २ एप्रिलपर्यंत नियोजित असलं तर हे कामकाज कोणत्याही दिनी स्थगित करण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार आणि विरोधी पक्ष या आठवड्यात कुठलल्याही दिवशी अधिवेशन स्थगित करण्याच्या निर्णयावर सहमत होऊ शकतात. 

याबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांनी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित करण्याची मागणी केली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेचं अधिवेशह अनिश्चित काळासाठी स्थगित केलं जाणार नाही. म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप करण्याऐवजी काही काळासाठी कामकाज स्थगित केलं जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. तसेच पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका हे त्या मागचं कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी व्हायचे आहे. मात्र अधिवेशन सुरू असताना प्रचारासाठी जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे हे अधिवेशन स्थगित करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. 

Web Title : संसद का बजट सत्र चुनावों के कारण स्थगित होने की संभावना है।

Web Summary : विधानसभा चुनावों के कारण बजट सत्र जल्द ही स्थगित किया जा सकता है। विपक्ष ने स्थगन का अनुरोध किया ताकि सदस्य प्रचार कर सकें। जल्द ही अंतिम निर्णय अपेक्षित है।

Web Title : Parliament's budget session likely to be adjourned due to elections.

Web Summary : The budget session might be adjourned early due to assembly elections. Opposition requested adjournment so members can campaign. A final decision is expected soon.