Pimpri Chinchwad Water Cut: पिंपरी-चिंचवड शहरात २८ एप्रिलला सायंकाळी दुरुस्तीसाठी पाणी राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 13:14 IST2026-04-22T13:14:25+5:302026-04-22T13:14:42+5:30

Pimpri Chinchwad Water Supply Cut: पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये खंड पडू नये, यासाठी वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असते

Pimpri Chinchwad Water Cut Evening water supply will remain in Pimpri-Chinchwad city on April 28 | Pimpri Chinchwad Water Cut: पिंपरी-चिंचवड शहरात २८ एप्रिलला सायंकाळी दुरुस्तीसाठी पाणी राहणार बंद

Pimpri Chinchwad Water Cut: पिंपरी-चिंचवड शहरात २८ एप्रिलला सायंकाळी दुरुस्तीसाठी पाणी राहणार बंद

पिंपरी: महापालिकेच्या वतीने निगडी जलशुद्धीकरण केंद्र येथे करण्यात येणाऱ्या स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवारी (दि. २८) पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि. २९) सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये खंड पडू नये, यासाठी वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत से. क्र. २३ येथील तसेच क्षेत्रीय स्तरावरील स्थापत्य व विद्युतविषयक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी २८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करून सहकार्य करावे. देखभाल-दुरुस्तीची सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील राहील.  - प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका

Web Title : पिंपरी चिंचवड में 28 अप्रैल को मरम्मत के लिए पानी कटौती

Web Summary : निगडी जल शोधन केंद्र पर रखरखाव के कारण 28 अप्रैल को पिंपरी-चिंचवड में शाम को पानी की आपूर्ति बाधित रहेगी। अगली सुबह आपूर्ति अनियमित रहेगी। निवासियों से पानी बचाने का अनुरोध है। नगर निगम सेवाओं को शीघ्र बहाल करने के लिए काम कर रहा है।

Web Title : Pimpri Chinchwad Faces Water Cut on April 28 for Repairs

Web Summary : Pimpri-Chinchwad will face an evening water supply cut on April 28 due to maintenance at the Nigdi water purification center. The next morning's supply will be irregular. Residents are requested to conserve water. The municipal corporation is working to restore services quickly.